• Download App
    होय, भाजपच बहुमताने जिंकतोय; "फायनली" योगेंद्र यादवांची कबुली; पण काँग्रेस 100 पार होणार का??|BJP is winning with majority; "Finally" Yogendra Yadav's Confession; But will Congress cross 100?

    होय, भाजपच बहुमताने जिंकतोय; “फायनली” योगेंद्र यादवांची कबुली; पण काँग्रेस 100 पार होणार का??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : होय, भाजपच बहुमताने जिंकतोय अशी “फायनल” कबुली मोदीविरोधी आंदोलनातले आंदोलनातला एक महत्त्वाचा चेहरा योगेंद्र यादव यांनी दिली. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी भाजपच्या जिंकण्याच्या केलेल्या भाकिताला छेद देणारे भाकीत योगेंद्र यादव यांनी केले होते. ते भाकीत योगेंद्र यांनी स्वतःच बदलले.BJP is winning with majority; “Finally” Yogendra Yadav’s Confession; But will Congress cross 100?



    भाजप जिंकणार नाही, असे भाकीत योगेंद्र यादव यांनी आधी केले होते, पण आता मात्र भाजप बहुमताने जिंकतोय. भाजपला 240 ते 260 जागा मिळतील आणि त्याच्या मित्र पक्षांना 35 ते 45 जागांच्या दरम्यान जागा मिळतील. याचा अर्थ भाजपवर 275 ते 305 या रेंजमध्ये राहील. त्यामुळे अर्थातच मोदी सरकार स्थापन व्हायला कुठली अडचण राहणार नाही, याची कबुली योगेंद्र यादव यांनी “फायनली” दिली. “फायनली” म्हणण्याचे कारण असे की, त्यांनी लोकसभा निवडणुकीचा निकालचा आपला अंतिम आकडा पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला.

    त्याचबरोबर योगेंद्र यादव यांनी काँग्रेससाठी एक “गुड न्यूज” सांगितली. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस फक्त डबल डिजिट आकडा गाठू शकली होती. 2014 मध्ये काँग्रेसला 44, तर 2019 मध्ये 54 जागा मिळाल्या होत्या. याचा अर्थ काँग्रेस सलग दोन निवडणुकांमध्ये 50 च्या आसपास घोटाळात होती. मात्र 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला 85 ते 100 जागा मिळतील. कदाचित काँग्रेस 100 चा आकडा ओलांडेल, असे भाकीत योगेंद्र यादव यांनी नोंदविले. त्याचबरोबर काँग्रेस प्रणित इंडी आघाडीला 120 ते 135 जागा मिळतील. त्यामुळे देशाच्या संसदेत एक बळकट विरोधी पक्ष दिसेल, असा दावा भाकीत योगेंद्र यादव यांनी केला.

    ज्या प्रशांत किशोर यांच्या भाकिताला आधी योगेंद्र यादव यांनी भाजप जिंकणार नसल्याचे भाकीत करून छेद दिला होता, त्या प्रशांत किशोर यांनी योगेंद्र यादव यांचे “फायनल” भाकीत आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. निवडणूक रणनीती आणि भाकितामधला एक विश्वसनीय चेहरा असे प्रशांत किशोर यांनी योगेंद्र यादव यांचे वर्णन केले आहे.

    BJP is winning with majority; “Finally” Yogendra Yadav’s Confession; But will Congress cross 100?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य