• Download App
    व्होट बॅँकेच्या राजकारणाला भाजपा घाबरत नाही, अमित शहा यांनी दिला इशारा|BJP is not afraid of vote bank politics, Amit Shah warned

    व्होट बॅँकेच्या राजकारणाला भाजपा घाबरत नाही, अमित शहा यांनी दिला इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मिझार्पूर : व्होट बँकेच्या राजकारणामुळे अनेक कामे झाली नाहीत. मात्र, भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही. आदित्यनाथ सरकार येण्यापूर्वी पश्चिम उत्तरप्रदेशात भीतीचे वातावरण होते. लोक परिसर सोडून जात होते. महिलांना कायमच असुरक्षित वाटत होते.BJP is not afraid of vote bank politics, Amit Shah warned

    भूमाफियांचा प्रचंड धुमाकूळ होता. गरीब लोकांची जमीन बळकावणे, दिवसा गोळीबाराच्या घटना आणि दंगली मोठ्या प्रमाणावर होत होत्या. आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेत उत्तरप्रदेशला पहिल्या स्थानावर आणले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.



    अमित शहा उत्तर प्रदेशच्या एक दिवसाच्या दौºयावर होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, बºयाच दिवसांनंतर उत्तर प्रदेशात आलो आहे. पण जेव्हा केव्हा येतो, तेव्हा घरी आल्यासारखे वाटते. याच उत्तर प्रदेशने 2014, 2017 आणि 2019 मध्ये संपूर्ण बहुमताचे सरकार दिले आहे.

    उत्तर प्रदेशची अपेक्षा आणि आवश्यकता काय आहेत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्णपणे माहीत आहे. 550 वर्षांपासून रखडून पडलेल्या राम मंदिराची सुरुवात मोदीजींनी केली. भाजप सरकारने प्रत्येक परंपरा जिवंत केली आहे. आपल्या आस्थेचा सन्मान का होत नाही, असा प्रश्न लोक करत होते. माझा प्रश्न आहे, राम मंदिर का बांधण्यात आले नाही? विंध्यवासिनीचे काम का झाले नाही?

    शहा म्हणाले, निवडणुका आल्या की सक्रीय होणाºया नेत्यांची सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेशातच आहे. योगी सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत. त्या आधी नव्हत्या. उत्तर प्रदेशात नेहमीच दंगली व्हायच्या, मात्र, आता दंगली होत नाहीत. योगींनी राज्यात कायद्याचे राज्य आणले आहे.

    भाजपा सरकार जात, कुटुंब किंवा त्यांच्या जवळच्या लोकांच्या आधारावर काम करीत नाही, तर गरीब व्यक्तींच्या विकासासाठी आणि कायदा-सुव्यवस्था बळकट करण्यासाठी काम करते. राज्यात विकास आणि कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याचे श्रेय मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे आहे.

    आज 44 विकास योजनांमध्ये उत्तरप्रदेश देशात अव्वल स्थानावर आहे. योजना बनवणे खूप सोपे आहे. परंतु, त्यांची अंमलबजावणी करणे, मध्यस्थ-दलालांची हकालपट्टी करणे आणि लाभार्थ्यांपर्यंत कोणतीही लाच न घेता योजनेचा लाभ सुनिश्चित करणे खूप कठीण आहे.

    BJP is not afraid of vote bank politics, Amit Shah warned

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!