- ‘भारत माता की जय, जनता जनार्दन की जय’ चा दिला नारा
विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात भाजपचे सरकार स्थापन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.BJP is back in power in Madhya Pradesh Shivraj Singh Chauhans first reaction
मुख्यमंत्र्यांनी म्हटले – ‘भारत माता की जय, जनता जनार्दन की जय’ आज मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत आणि मला विश्वास आहे की जनतेच्या आशीर्वादाने आणि नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारची पुन्हा स्थापना होईल. पुन्हा पूर्ण बहुमताने सरकार येणार आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.
वृत्त लिहीपर्यंत भाजप 133, काँग्रेस 93 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहे. या ट्रेंडवर कमलनाथ यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी अजून ट्रेंड पाहिलेला नाही, पण माझा मध्य प्रदेशातील लोकांवर विश्वास आहे.
राजकारणाचा मार्ग नेहमीच निसरडा, वारंवार घसरण्याची शक्यता, पण…; शिवराज सिंह चौहान यांचे सूचक उद्गार
मध्य प्रदेशातील 230 विधानसभा जागांसाठी रविवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली आणि अधिकाऱ्यांनी 52 जिल्हा मुख्यालयात पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली. एका उच्चपदस्थ निवडणूक अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
राज्यात 17 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या. अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात विक्रमी 77.82 टक्के मतदान झाले, जे 2018 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा (75.82 टक्के) 2.19 टक्के जास्त आहे.
BJP is back in power in Madhya Pradesh Shivraj Singh Chauhans first reaction
महत्वाच्या बातम्या
- छत्तीसगडमधील निकालापूर्वी भूपेश बघेल यांनी मोदींना लिहिले पत्र, केली मोठी मागणी!
- राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातील मतमोजणीला सुरुवात
- मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत
- व्हॉट्सॲपने ऑक्टोबरमध्ये भारतात 75 लाखांहून अधिक बनावट खात्यांवर घातली बंदी