• Download App
    इलेक्टोरल बॉन्ड्सच्या कमाईत भाजप काँग्रेसवर 7 पट भारी; मतांच्या बेगमीची जोरदार तयारी!! BJP is 7 times heavier than Congress in earnings of electoral bonds

    इलेक्टोरल बॉन्ड्सच्या कमाईत भाजप काँग्रेसवर 7 पट भारी; मतांच्या बेगमीची जोरदार तयारी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अख्खा काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत मग्न असताना काँग्रेसचे इलेक्ट्रॉन बॉन्ड महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भाजप काँग्रेस वर त्या विषयात सातपट भारी ठरला त्यामुळे मतांची बेगमी पक्की झाली आहे. BJP is 7 times heavier than Congress in earnings of electoral bonds

    निवडणूक आयोगाला सोपवण्यात आलेल्या वार्षिक ऑडिट रिपोर्टनुसार, 2022-23 मध्ये भाजपला एकूण 2,120 कोटी रुपये मिळाले ज्यामध्ये एकूण 61 टक्के हे इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळाले आहेत.

    केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून तब्बल 1,300 कोटी रूपयांच्या देणग्या मिळवल्या आहेत. ही रक्कम याच काळात काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांपेक्षा तब्बल सातपट अधिक आहे.

    निवडणूक आयोगाला सोपवण्यात आलेल्या वार्षिक ऑडिट रिपोर्टनुसार, 2022-23 मध्ये भाजपला एकूण 2,120 कोटी रुपये मिळाले ज्यामध्ये एकूण 61 टक्के हे इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळाले आहेत. यापूर्वी 2121-22 मध्ये पक्षाला एकूण 1,775 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. पक्षाच्या एकूण उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर 2022-23 मध्ये ते 2,360.8 कोटी रुपये होते, जे 2021-22 मध्ये 1,917 कोटी रुपये होते.

    दुसरीकडे, काँग्रेसने इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून 171 कोटी रुपये कमावले आहेत, जे 2021-22 या आर्थिक वर्षातील 236 कोटी रुपयांपेक्षा कमी आहेत.

    राज्य पातळीवर, समाजवादी पक्षाने 2021-22 मध्ये इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून 3.2 कोटी रुपये कमावले होते, पण 2022-23 मध्ये या बाँडद्वारे त्यांना एकही रुपया मिळाला नाही. त्याच वेळी, तेलगू देसम पार्टी (टीडीपी)ला 2022-23 मध्ये इलेक्टोरल बॉन्डद्वारे 34 कोटी रुपये मिळाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10 पट जास्त आहेत.

    व्याजातूनही कमाई वाढली

    भाजपला गेल्या आर्थिक वर्षात 237 कोटी रुपये व्याज म्हणून मिळाले आहेत, जे 2021-22 या वर्षाच्या तुलनेत 135 कोटी रुपये अधिक आहे. निवडणूक आणि सर्वसाधारण प्रचारावरील एकूण खर्चापैकी, भाजपने विमान आणि हेलिकॉप्टरच्या वापरासाठी 78.2 कोटी रुपये खर्च केलेय जे 2021-22 मध्ये खर्च केलेल्या 117.4 कोटी रुपयांपेक्षा कमी आहेत. पक्षाने उमेदवारांना आर्थिक सहाय्य म्हणून 76.5 कोटी रुपये दिले, जे 2021-22 साठी देण्यात आलेल्या 146.4 कोटी रुपयांच्या तुलनेत कमी आहेत.

    BJP is 7 times heavier than Congress in earnings of electoral bonds

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार