आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएचे शक्तीप्रदर्शन म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण 18 जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एनडीएच्या बैठकीला भाजपाचे अनेक नवे मित्रपक्ष उपस्थित राहू शकतात. BJP invites Jana Sena chief Pawan Kalyan to NDA meeting
यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) च्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील विविध छोटे पक्ष आणि पूर्वोत्तर राज्यांमधील प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाचे वरिष्ठ नेते अकाली दल आणि तेलुगु देसम पार्टीही एनडीएचा पुन्हा एकदा भाग बनण्याची चिन्ह आहेत. मात्र, याला दोन्ही बाजूंनी अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
चिराग पासवान आणि मांझी देखील सहभागी होऊ शकतात –
भाजपाने एलजेपी (रामविलास) प्रमुख चिराग पासवान आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना औपचारिकपणे एनडीएमध्ये सामील होण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वतीने दोन पत्रे लिहिली आहेत. यामध्ये चिराग आणि जीतन राम मांझी यांच्या नावाचा उल्लेख आहे. चिराग पासवान आणि जीतनराम मांझी यांना एनडीएमध्ये येण्याचे औपचारिक निमंत्रण भाजपाने दिल्याचे या दोन्ही पत्रांवरून स्पष्ट झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा अध्यक्षांनी इतर अनेक पक्षांच्या नेत्यांनाही अशीच पत्रे लिहिली आहेत. यामध्ये त्या पक्षांचा समावेश आहे, ज्यांच्याशी भाजपा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करण्याचा प्रयत्न करत आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहू शकतात. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएच्या ताकदीचे प्रदर्शन म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे.
BJP invites Jana Sena chief Pawan Kalyan to NDA meeting
महत्वाच्या बातम्या
- अर्थमंत्री अजितदादांना मंत्रालयात सहाव्या नव्हे, पाचव्या मजल्यावरचे 503 क्रमांकाचे दालन!!
- हिमाचलमध्ये पाऊस आणि पुराचा कहर; मुख्यमंत्री सुखू म्हणाले आतापर्यंत ६० हजार जणांना वाचवलं!
- तडजोड : अर्थ आणि सहकार ही दोनच मलईदार खाती राष्ट्रवादीकडे; अजितदादा अर्थमंत्री, पण जलसंपदा खाते फडणवीसांकडे, तर महसूल खाते विखेंकडेच!!;
- मिशन चंद्रयान 3 यशस्वी!!; पंतप्रधान मोदींनी फ्रान्स मधून केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन!!