विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्याबरोबर भाजपने आपल्या राज्यांच्या मंत्रिमंडळाचे राम दर्शनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भाजप आणि भाजपचे मित्र पक्ष शासित राज्यांचे मुख्यमंत्री आपापल्या सर्व मंत्रिमंडळ असो वेगवेगळ्या दिवसांमध्ये अयोध्येत येऊन बालक रामाचे दर्शन घेणार आहेत. ते दिवसभर अयोध्येत असणार आहेत आणि तिथूनच कदाचित आपापल्या राज्यांसाठी मोठमोठ्या योजना हे मुख्यमंत्री जाहीर करण्याची शक्यता आहे. BJP has set the schedule of Ram Darshan of its state ministers
अयोध्येत संपूर्ण मंत्रिमंडळात सकट येऊन राम दर्शनाचा पहिला मुहूर्त गाठला आहे, तो त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी. 31 जानेवारी रोजी त्रिपुराचे संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येत येऊन राम दर्शन करणार आहे. त्यांच्यापाठोपाठ 1 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशाचे संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येत येऊन राम दर्शन करेल.
2 फेब्रुवारीला उत्तराखंडाचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आपल्या मंत्रिमंडळासह बालक रामाचे दर्शन घेतील. त्यांच्या पाठोपाठ 5 फेब्रुवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण मंत्रिमंडळासह अयोध्येत पोहोचून राम दर्शन करतील, अरुणाचल सिंग अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री विमा खंडू 6 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळासह राम दर्शनाला येणार आहेत.
हरियाणाचे मुख्यमंत्री मोहनलाल कट्टर 9 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळासह बालक रामाचे दर्शन घेणार आहेत, तर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा 12 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळासह राम दर्शन करतील.
15 फेब्रुवारीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्याचे मंत्रिमंडळ घेऊन राम दर्शनाला येणार आहेत, तर 22 फेब्रुवारी रोजी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा आपल्या मंत्रिमंडळासह राम दर्शन करतील, 24 फेब्रुवारीला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह गुजरातचे मंत्रिमंडळ बालक रामाचे दर्शन घेतील, तर 4 मार्च रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आपल्या मंत्रिमंडळासह राम दर्शनाला अयोध्येत येणार आहेत.
हे सर्व मुख्यमंत्री आपल्या नियोजित तारखेला अयोध्येत दिवसभर थांबणार असून तेथे कदाचित मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपापल्या राज्यांसाठी ते मोठमोठ्या कल्याणकारी योजना जाहीर करण्याची शक्यता आहे.
BJP has set the schedule of Ram Darshan of its state ministers
महत्वाच्या बातम्या
- कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर; केंद्राची घोषणा; दोन वेळा राहिले बिहारचे मुख्यमंत्री
- महाराष्ट्र अवयवदानात देशात अग्रेसर; शेकडो रुग्णांना जीवदान
- राम मंदिराचे मुख्यमंत्री योगी यांनी केले हवाई निरीक्षण
- मीरा रोडच्या नया नगरमध्ये बुलडोझरची धडक कारवाई, दंगलखोरांची बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त!!