जाणून घ्या नेमकी कोणी केली तक्रार आणि काय आहे कारण?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याविरोधात भाजपाच्यावतीने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. भाजपा प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधींविरोधात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. BJP has filed a complaint against Congress leader Priyanka Gandhi before the Election Commissioner
त्यांच्या म्हणण्यानुसार, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नेत्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे धार्मिक भावनांच्या आधारे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध वाईट बोलल्याबद्दल प्रियांका गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी सिकराई (दौसा) येथील जाहीर सभेत त्यांच्यावर खोटेपणा पसरवल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
प्रियांका यांनी शुक्रवारी सिकराई येथे एका जाहीर सभेला संबोधित केले होते. भाजपा निवडणूक व्यवस्थापन समितीचे निमंत्रक नारायण पंचारिया यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन सादर करून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून आऊटडोर मीडियाला मान्यता देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी केली आहे.
BJP has filed a complaint against Congress leader Priyanka Gandhi before the Election Commissioner
महत्वाच्या बातम्या
- भारताचा मोस्ट वॉन्टेड लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक दाऊद मलिक पाकिस्तानात ठार
- खासदार महुआ मोईत्रांच्या लाचखोरीतून प्रश्न घोटाळ्यातून तृणमूळ काँग्रेसने झटकले हात!!
- महुआ मोईत्राच्या अडचणी वाढण्याची चिन्हं! लोकसभा अध्यक्षांनंतर आता निशिकांत दुबे यांनी केली लोकपालकडे तक्रार
- अमेठीतून वायनाडला गेलेल्या राहुल आणि प्रियांका गांधींना भाजप खासदाराचे उन्नाव मधून निवडणूक लढविण्याचे आव्हान!!