• Download App
    भाजपने 5 मुख्यमंत्री बदलले तरी सर्वांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय स्वीकारला, पंजाबमध्ये तसे करणाऱ्या काँग्रेससमोर प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान । BJP has changed 5 Chief Ministers, But it Congress Facing challenges to maintain its prestige in Punjab

    भाजपने 5 मुख्यमंत्री बदलले तरी सर्वांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय स्वीकारला, पंजाबमध्ये तसे करणाऱ्या काँग्रेससमोर प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान

    Congress Facing challenges : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये अपमान झाल्याचे म्हणत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. हायकमांडने ज्यांच्यावर विश्वास असेल त्याला मुख्यमंत्री करावे, असे ते म्हणाले. तथापि, आता पंजाबमध्ये काँग्रेस आणि नवीन मुख्यमंत्र्यांचा मार्ग खडतर असणार, हे स्पष्ट आहे. भाजपने 6 महिन्यांत 5 मुख्यमंत्री बदलले. आगामी निवडणुकांसाठी भाजपने रणनीती हे पाऊल उचलले, तुरळक विरोध होऊनही भाजपमध्ये पक्षश्रेष्ठींचा निर्णय शांततेने स्वीकारला गेला. दुसरीकडे, काँग्रेसने पंजाबात तसे करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासमोर प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. BJP has changed 5 Chief Ministers, But it Congress Facing challenges to maintain its prestige in Punjab


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये अपमान झाल्याचे म्हणत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. हायकमांडने ज्यांच्यावर विश्वास असेल त्याला मुख्यमंत्री करावे, असे ते म्हणाले. तथापि, आता पंजाबमध्ये काँग्रेस आणि नवीन मुख्यमंत्र्यांचा मार्ग खडतर असणार, हे स्पष्ट आहे. भाजपने 6 महिन्यांत 5 मुख्यमंत्री बदलले. आगामी निवडणुकांसाठी भाजपने रणनीती हे पाऊल उचलले, तुरळक विरोध होऊनही भाजपमध्ये पक्षश्रेष्ठींचा निर्णय शांततेने स्वीकारला गेला. दुसरीकडे, काँग्रेसने पंजाबात तसे करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासमोर प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

    25 आमदारांचा अमरिंदर यांना पाठिंबा

    कॅप्टन अमरिंदर यांनी राजीनामा देण्यासाठी राजभवन सोडले, तेव्हा काँग्रेसचे 19 आमदार त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. असे सांगितले जाते की, किमान 25 आमदार त्यांच्या बाजूने आहेत. अशा स्थितीत जो कोणी काँग्रेसचा नवा मुख्यमंत्री असेल, त्याच्यासाठी पक्षात निर्माण झालेला असंतोष शांत करण्याचे मोठे आव्हान असेल.

    अमरिंदर यांनी काँग्रेस सोडल्यास पंजाबमध्ये मोठे उलटफेर

    पंजाबमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर यांनी भविष्यातील राजकारणाचा पर्याय खुला असल्याचे म्हटले आहे. आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर भविष्यातील राजकारणावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर त्यांनी काँग्रेसबाहेर त्यांचे राजकीय भवितव्य शोधले तर काँग्रेस एका मोठ्या नेत्यालाच गमावणार नाही, तर निवडणुकीपूर्वीच पक्ष कमकुवत होईल.

    भाजपसाठी मोठी संधी

    काँग्रेसव्यतिरिक्त कॅप्टनच्या मनात भाजपबद्दलही प्रेम असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. 2017च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तेव्हाही त्यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी त्यांची जवळीक लपून राहिलेली नाही. अमरिंदर जेव्हाही दिल्लीला जातात, तेव्हा त्यांना पंतप्रधानांना भेटण्याची वेळ सहज मिळते. ते अनेकदा गृहमंत्री अमित शहा यांना भेटतात. आता कॅप्टनच्या राजीनाम्यानंतर भाजप त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. कॅप्टन भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचीही राजकीय गोटात चर्चा आहे.

    BJP has changed 5 Chief Ministers, But it Congress Facing challenges to maintain its prestige in Punjab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!