वृत्तसंस्था
गुवाहाटी – अल्पसंख्यांक समूदायाने आपली गरिबी हटविण्यासाठी कुटुंब नियोजन करावे. लोकसंख्येचा भस्मासूर आपला सगळा विकास खाऊन टाकतो, हे लक्षात घेऊन अल्पसंख्यांक समूदायातील जाणत्या लोकांनी पुढाकार घेऊन समाजाला सुशिक्षित करावे, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी कालच केले होते. या आवाहनाच्या विरोधात आसाममधून आवाज आला आहे. BJP govt works for a particular section & ignores others: AIUDF MLA on Assam CM Himanta Biswa Sarma
बद्रुद्दीन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे आमदार हफीज रफीकुल इस्लाम यांनी हेमंत विश्वशर्मा यांच्या वक्तव्याला विरोध केला आहे. हेच ते बद्रुद्दीन अजमल आहेत, की ज्यांच्या पक्षाने आसाममध्ये २०२१ च्या निवडणूकीनंतर टोपी, दाढी आणि लुंगीचे सरकार येईल, असा दावा केला होता. अजमल यांच्या पक्षाशी काँग्रेसने युती करून निवडणूक लढविली होती.
त्या पक्षाचे आमदार हफीज रफीकुल इस्लाम यांनी हेमंत विश्वशर्मा यांच्या कुटुंब नियोजनावरील विधानावर आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी एकाच समूदायाला जास्त मुले असतात असे विधान केले आहे. ते करण्यापेक्षा त्यांनी खरी कारणे शोधून काढावीत. खुद्द त्यांनाच ६ – ७ भावंडे असल्याचे मी ऐकले आहे आणि आज तेच एका समूदायालाच कुटुंब नियोजनाचा उपदेश करीत आहेत हे विचित्र आहे, असे वक्तव्य हफीज इस्लाम यांनी केले.
भाजपचे सरकार नेहमी एकाच समूदायाला कुटुंब नियोजन करायला सांगते आणि अन्य समूदायांकडे दुर्लक्ष करते, असा दावाही हफीज इस्लाम यांनी केला. त्याचवेळी आपण कुटुंब नियोजनाच्या धोरणा विरोधात नसल्याचा दावाही त्यांनी केला.
-काय म्हणाले होते हेमंत विश्वशर्मा…
अल्पसंख्यांक समूदायाने आपली गरिबी दूर करण्यासाठी कुटुंब नियोजन करून कुटुंबाची सदस्य संख्या मर्यादित ठेवावी. यासाठी महिलांचे प्रबोधन करावे. सरकार त्यासाठी मदत करेल. अल्पसंख्यांक समूदायातील सुजाण, सुशिक्षित नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हेमंत विश्वशर्मा यांनी केले होते.
आपला सगळ्यांचा विकास करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आपल्या विकासाच्या योजनाही मोठ्या प्रमाणात सरकार अमलात आणते. पण अवाढव्य लोकसंख्येचा राक्षस हा विकास खाऊन टाकतो. अन्न, शिक्षण, आरोग्य या व्यवस्था पुरेशा मिळत नाहीत. विकासाची फळे जादा लोकसंख्येमुळे सर्व नागरिकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाहीत. याचे आत्मपरीक्षण अल्पसंख्यांक समूदायातील सुजाण नागरिकांनी करावे. आपल्या समाजाला प्रगतीसाठी हे आवश्यक आहे, यावर विश्वशर्मा यांनी भर दिला होता.
BJP govt works for a particular section & ignores others: AIUDF MLA on Assam CM Himanta Biswa Sarma
महत्त्वाच्या बातम्या
- म्युकरमायकोसीस मुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणा ; मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला खडसावले ; Amphotericin हे औषध योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आदेश
- कुलभूषण जाधव यांना उच्च न्यायालयात दाद मागता येणार; पाकिस्तानची नरमाईची भूमिका
- तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी, राज्य सरकारचा निर्णय ; नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा