• Download App
    काँग्रेसला 10 लाख मते जादा मिळाल्याचे पिटले ढोल; पण भाजपला देशात 50 % + मते खेचण्याचा मध्य प्रदेशातून मिळाला बुस्टर डोस!! BJP got booster dose in madhya pradesh to reach its original target of getting 50 % + votes in the country

    काँग्रेसला 10 लाख मते जादा मिळाल्याचे पिटले ढोल; पण भाजपला देशात 50 % + मते खेचण्याचा मध्य प्रदेशातून मिळाला बुस्टर डोस!!

    सेमी फायनल निवडणूकीत 5 राज्यांमध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा 10 लाख मते मिळाल्याचे पिटले ढोल; पण भाजपला देशात 50 % + मते खेचण्याचा मध्य प्रदेशातून मिळाला बुस्टर डोस!!, हे प्रत्यक्षात घडून देखील यातल्या सुरवातीच्या अर्ध्याच भागावर देशातल्या लिबरल मीडियाने भर देऊन काँग्रेसनिष्ठ नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. यात खुद्द काँग्रेस प्रवक्त्यांचा हात होताच, पण योगेंद्र यादवांसारख्या लिबरल सेफॉलॉजिस्टचा हातभार होता. BJP got booster dose in madhya pradesh to reach its original target of getting 50 % + votes in the country

    पण सुप्रिया श्रीनेत सारख्या काँग्रेस प्रवक्त्याने किंवा योगेंद्र यादव यांच्यासारख्या सेफॉलॉजिस्टने आकड्यांचा खेळ करत कितीही काँग्रेसनिष्ठ नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, तरी प्रत्यक्षात आकड्यांमधली आणि जमिनीवरची वस्तुस्थिती बदलत नाही. कारण काँग्रेसला मिळालेल्या एकूण 4 कोटी 90 लाख मतांपैकी भाजपपेक्षा 59 लाख मते फक्त तेलंगणातून जादा मिळाली आहेत. बाकी सगळ्या राज्यांमध्ये भाजपलाच काँग्रेसपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. भाजपला एकूण 4 कोटी 81 लाख मते मिळाली, त्यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसपेक्षा 50 लाख मते जास्त मिळवून भाजप सत्तेवर आला. भाजप आणि काँग्रेस मधल्या एकूण मतांचा फरक 10 लाखांच्या आसपास आहे, ही वस्तुस्थिती फक्त तेलंगणातल्या काँग्रेसला मिळालेल्या मताधिक्याने दिसली आहे… आणि इथेच आकडेवारीतले मायाजाल दिसते आहे.

    हे म्हणजे असे झाले, की परीक्षेत एका पेपरात डिस्टिंक्शन आणि बाकी 3 पेपरात नापास, तरीही सर्व परीक्षेत पास झाल्याचा दावा करण्यासारखे आहे आणि तो दावा काँग्रेसने केला आहे.

    मग वर उल्लेख केलेल्या आकड्यातून नेमकी कोणती वस्तुस्थिती समोर येते??, याचा टक्केवारीच्या आकड्यातून बारकाईने हिशेब काढला, तर चित्र अधिक स्वच्छ दिसते, ते म्हणजे भाजपला मध्य प्रदेशातून पक्षाने ठेवलेल्या मूळ ध्येयाच्या आकड्याच्या दिशेने जाण्याचा बूस्टर डोस मिळाला आहे.

    भाजपने 2024 च्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात एकूण मतदानाच्या 50 % पेक्षा जास्त मते मिळवण्याचे मूळ ध्येय ठेवले आहे. भाजपला 50 % + मते मिळवण्यातून कोणतीही “पॉलिटिकल रिस्क” घ्यायची नाही म्हणजे मतदानोत्तर आघाडीचे राजकारण फिरू देण्याची “रिस्क” घ्यायची नाही हेच स्पष्ट आहे.

    भाजपला मध्य प्रदेशात 48.55 % मते मिळाली आहेत. कोणत्याही मोठ्या राज्यात मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत सध्या तरी ही सर्वोच्च संख्या आहे. याचा खरा अर्थ असा की, भाजप मध्य प्रदेशात वापरलेला निवडणूक फॉर्म्युला अन्य राज्यांमध्ये रिपीट करून आपल्या 50 % + पेक्षा जास्त मते मिळवण्याच्या मूळ ध्येयाकडे वाटचाल करू शकतो, असा सकारात्मक धडा यातून शिकता येऊ शकेल.

    भाजपने मध्य प्रदेशात ज्या पद्धतीने बूथ मॅनेजमेंट करून मतदानाच्या टक्केवारीत महिलांची संख्या वाढेल याकडे विशेष लक्ष पुरविले. त्याचबरोबर आपला विशिष्ट टार्गेट ऑडियन्स मतदान केंद्रावर येऊन प्रत्यक्ष मतदान करेल, यासाठी जी प्रत्यक्ष कृती यंत्रणा राबवली, या अनुभवाचा वापर अन्य राज्यांमध्ये नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करता येऊ शकेल. यातूनच 50 % + पेक्षा जास्त मते मिळवण्याच्या ध्येयानिकट भाजप जाऊ शकेल, मग काँग्रेसला आणि बाकीच्या विरोधकांच्या मतांची टक्केवारी कितीही वाढो किंवा कमी होवो, त्यातून भाजपच्या मतांना काही डग लागणार नाही, हा भाजपच्या निवडणूक रणनीतीकारांचा होरा आहे. तू भल्या भल्या सेफॉलॉजिस्टच्या डोक्याबाहेरचा आहे.

    पण काँग्रेसला ज्यादा मते मिळाली या आकड्याचा ढोल पिटत मतांच्या आकडेवारीचे लटकते गौडबंगाल मांडून लिबरल मीडियाने नेमके सत्य जनतेसमोर दिले नाही आणि काँग्रेसला हरभऱ्याच्या झाडावर चढवून ठेवले!!, हे आकडेवारीने सिद्ध झाले.

    BJP got booster dose in madhya pradesh to reach its original target of getting 50 % + votes in the country

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!