• Download App
    देशात सर्वाधिक लसींचा पुरवठा महाराष्ट्राला तरी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून केंद्राविरुध्द कांगावा | BJP gives ticket of panchayat election to unnav rape case accused`s wife

    उन्नाव बलात्कारातील आरोपी कुलदीप सेनगरच्या पत्नीला भाजपचे पंचायत निवडणूकीत तिकीट

    वृत्तसंस्था

    लखनौ – उन्नाव बलात्कारातील आरोपी माजी आमदार कुलदीप सेनगरच्या पत्नीला भाजपाने पंचायत निवडणुकीचे तिकीट दिले आहे. संगीता सेनगर भाजपाच्या तिकीटीवर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढणार आहेत. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद होते. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत. BJP gives ticket of panchayat election to unnav rape case accused`s wife

    कुलदीप सेनगर हे भाजपा आमदार होते. बलात्कार प्रकरणात नाव आल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. उत्तर प्रदेश पंचायत निवडणूक चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. १५ एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आङे. २ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.



    गेल्यावर्षी भाजपाने पक्षातून बडतर्फ केलेल्या कुलदीप सेनगर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयाने सेनगर यांना दोषी ठऱवत १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. १० लाखांचा दंडही ठोठावला होता. यामध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचा कुलदीप सेनगर यांचा दावा आहे. दरम्यान २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयाने कुलदीप सेनगर यांना आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

    BJP gives ticket of panchayat election to unnav rape case accused`s wife


    इतर बातम्या वाचा…

    Related posts

    Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या शिक्षकाला अटक

    Sonam Wangchuk : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी लेहमध्ये हिंसक निदर्शने, मूर्खपणा थांबवण्याचे सोनम वांगचुक यांचेआवाहन

    India Drone : ऑक्टोबरमध्ये भारताचा ड्रोन- काउंटर-ड्रोन सराव; एअर मार्शल म्हणाले- पाकिस्तान आपल्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतोय