• Download App
    पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीवर कारवाईची भाजपाची मागणीBJP demands action against Aam Aadmi Party

    पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीवर कारवाईची भाजपाची मागणी

    भाजपच्या शिष्टमंडळाने या मुद्द्यावर आयोगाकडे संपर्क साधला

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘अमान्य’ आणि ‘अनैतिक’ व्हिडिओ आणि टिप्पण्या पोस्ट केल्याबद्दल आम आदमी पक्षावर कारवाई करण्याची मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. BJP demands action against Aam Aadmi Party

    केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, पक्षाचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी आणि राज्यसभा  सदस्य अनिल बलूनी आणि पक्षाचे नेते ओम पाठक यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने या मुद्द्यावर आयोगाकडे संपर्क साधला.


    आमदार सुखपाल खैरांच्या अटकेवरून पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये संघर्ष!


    शिष्टमंडळाच्या सदस्यांनी विरोधी पक्षनेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर काँग्रेसशी संबंधित एका वेगळ्या मुद्द्यावर ‘निराधार आणि खोटे’ दावे केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले होते की मोदी सरकारने रोजगार निर्माण करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्सचे (पीएसयू) खासगीकरण केले आहे.

    ‘आप’ने बुधवारी ट्वीटरवर उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. दुसऱ्या दिवशी पक्षाने अदानी आणि मोदींचा फोटो पोस्ट केला आणि पंतप्रधान लोकांसाठी काम करत नसून उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप केला.

    BJP demands action against Aam Aadmi Party

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : शीख विवाहांची नोंदणी आनंद विवाह कायद्याअंतर्गत करा; सुप्रीम कोर्टाचे UP बिहारसह 17 राज्यांना आदेश

    India : भारताची अमेरिकेतील निर्यात सलग तिसऱ्या महिन्यात घसरली; ऑगस्टमध्ये निर्यात 16.3% घसरून 58,000 कोटींवर

    Hindenburg : हिंडेनबर्ग प्रकरणी सेबीची अदानींना क्लीन चिट; अदानी ग्रुपवर मनी लाँड्रिंगचा आरोप, मार्केट व्हॅल्यू 1 लाख कोटींनी कमी झाले