शहजाद पूनावाला यांनी व्हिडीओ ट्वीट करून टीका केली आहे, शिवाय ममता बॅनर्जींवरही निशाणा साधला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाच्या गोटातून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आता गंध लावण्यास नकार दिला आहे. ही घटना समोर आल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी ट्वीटरवर व्हिडिओ पोस्ट करून विरोधकांवर हल्ला चढवला आहे. BJP criticized after Siddaramaiah refused to Put the Tilak Shahzad Poonawala
‘ममता दीदींनंतर आता सिद्धरामय्या यांनी गंध लावून घेण्यास नकार दिला आहे. मी म्हटल्याप्रमाणे टोपी घालणे ठीक आहे पण गंध लावणे ठीक नाही का?
कारण I-N-D-I-A आघाडीने मुंबईत हिंदू आणि सनातन धर्मावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला आहे. उदयनिधी स्टॅलिनपासून ए राजापर्यंत, जी परमेश्वरापासून प्रियांक खर्गेपर्यंत, आरजेडीपासून सपापर्यंत या सर्वांची, “हिंदूंच्या श्रद्धा दुखावण्याची आणि व्होट बँकची मते मिळविण्याची” रणनीती आहे.
शहजाद पूनावाला यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवरही एक व्हिडीओ पोस्ट करून निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ”असं दिसतंय की ममता दीदींना जय श्रीराम नंतर आता गंधाचाही त्रास होत आहे. टोपी घालणे धर्मनिरपेक्ष आहे परंतु गंध लावणे जातीयवादी आहे?.”
BJP criticized after Siddaramaiah refused to Put the Tilak Shahzad Poonawala
महत्वाच्या बातम्या
- अमृता देशमुख चा होणाऱ्या नवऱ्यासाठी खास उखाणा! समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल
- ”जेडीयू-आरजेडी युती तेल आणि पाण्यासारखी आहे, ते कधीच…” अमित शाह यांचे विधान!
- बहुजनांनी तुम्हा उच्चवर्णीयांसाठी फक्त बलिदानच द्यायचे का??; सुजात आंबेडकरांनी रोहित पवारांना फटकारले
- लष्कराने घेतला हौतात्म्याचा बदला, बारामुल्लामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; अनंतनागमध्येही कारवाई सुरूच