वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात म्हणून भाजपमधून मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि काही आमदार बाहेर पडले या पार्श्वभूमीवर पक्षाची गळती रोखण्यासाठी आणि नवीन भरतीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कोअर कमिटीची काल 10 तास तास बैठक झाली. BJP Core Committee meeting ends after 10 hrs; Shah takes feedback from leaders on ground reality
आजही पुन्हा सकाळी 11 वाजल्यापासून बैठक होत असून बैठकीला केंद्रीय नेतृत्व बरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा उपस्थित असणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने 113 मतदार संघातील भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम आले. त्याचबरोबर भाजपमधून आणखी गळती होऊ नये यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील यावर व्यापक विचार विनिमय झाला.
उत्तर प्रदेशात 403 जागांपैकी भाजपचे 338 आमदार आहेत. यामध्ये उमेदवारांमध्ये किती प्रमाणात बदल करायचे तिकिटे कापलेल्या आमदारांच्या जागांवर संभाव्य बंडखोरी कशी रोखायची?, यांची व्यापक व्यूहरचना ठरवण्यात आली आहे. पक्षाचे 13 आमदार फुटण्याचे भाकित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत केले. परंतु प्रत्यक्षात स्वामी प्रसाद मौर्य यांनी जी यादी सांगितली होती, त्यापैकी अनेक आमदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचेही स्पष्ट होता आहे. स्वामी प्रसद मौऱ्या यांची कन्या खासदार संघप्रिया यांनी पक्ष सोडलेला नाही. शिवाय स्वामी प्रसाद मौर्य यांनीदेखील समाजवादी पक्षात प्रवेश केलेला नाही, असे संघप्रिया यांनी स्पष्ट केले आहे.
या राजकीय पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील जमिनीवरची राजकीय स्थिती नेमकी कशी आहे याचा आढावा सुद्धा स्वतः आमच्या अमित शहा घेत आहेत. आज सकाळी 11 वाजल्यापासून बैठकीला पुन्हा सुरुवात होणार आहे.
BJP Core Committee meeting ends after 10 hrs; Shah takes feedback from leaders on ground reality
महत्त्वाच्या बातम्या