वृत्तसंस्था
लखनऊ : एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना येणार एनपीआर आणि एनआरसीचा मुद्दा लावून धरला आहे. भाजप जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसींचा सर्वात मोठा नेता मानत असेल तर त्यांनी संपूर्ण देशात जात निहाय जनगणना करावी, असे आव्हान त्यांनी दिले. BJP considers Modi as the biggest OBC leader, then they should conduct a caste-wise census
जात निहाय नेमकी कोणती जात किती टक्के आहे हे समजेल तसेच कोणत्या जातीचे लोक देशातील साधन संपत्तीचा लाभ घेतात आणि कोणाला तो मिळत नाही हे समजून येईल, असे म्हणाले.
केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जात निहाय जनगणना करणे टाळत आहे. आज भाजपचे नेते मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रगत झाला असे म्हणतात. पण एवढ्या प्रगत झालेल्या देशात जनगणना होत नाही. याआधी प्रत्येक दशकांमध्ये जनगणना होत होती. त्या वेळी भारत प्रगत नसला तरी कोणत्याही साधनसामग्री शिवाय जनगणना व्हायची, असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला आहे.
जात निहाय जनगणना हे काही फक्त पंतप्रधान मोदींच्या हातातले खेळणे नाही. तो भारतीय जनतेचा हक्क आहे. जनगणनेच्या फॉर्ममधून एनपीआर अर्थात नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर हा कॉलम वगळून टाकावा. त्याऐवजी जातीचा उल्लेख ठेवावा. कारण नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर हे बेकायदा आहे आणि ती नॅशनल रजिस्टर फॉर सिटीझन अर्थात एनआरसीच्या दिशेने वाटचाल आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
BJP considers Modi as the biggest OBC leader, then they should conduct a caste-wise census
महत्त्वाच्या बातम्या
- विक्रम संपत विरोधातील मोहिमेत विद्यापीठीय विद्वानांच्या यादीत झाकीर नाईकच्या बरोबर संजय राऊत?; प्रियांका चतुर्वेदींकडून इन्कार, पण स्वतः राऊतांचे मौन
- Russia-Ukraine war : रशियाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा आघाडीचा प्रयत्न, आज UNSC मध्ये पुन्हा मतदान
- मन की बात : पंतप्रधान मोदी म्हणाले– भारताने 200 हून अधिक मौल्यवान मूर्ती यशस्वीपणे परत आणल्या