वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात असतानाच त्यांच्या राजीनाम्या विषयी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यातली सगळ्यात अजब प्रतिक्रिया आम आदमी पार्टीने व्यक्त केली आहे.BJP changes Uttarakhand, Gujarat CM; The Aam Aadmi Party took credit for itself
ज्या ज्या राज्यांमध्ये आम आदमी पार्टीने राजकारणात प्रवेश केला आहे तिथे भाजपने मुख्यमंत्री बदलल्याचा अजब दावा आम आदमी पार्टीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून केला आहे.
उत्तराखंडमध्ये आम आदमी पार्टीने प्रवेश केला. मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांना राजीनामा द्यावा लागला. आता गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने प्रवेश केला आहे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे, असे ट्विट आम आदमी पार्टी ने केले आहे.
जणू काही आम आदमी पार्टीने उत्तराखंड आणि गुजरातची विधानसभेची निवडणूक जिंकली असल्याचा दावा केला आहे. वास्तविक गुजरात मध्ये फक्त सूरत महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेसला मागे टाकून विरोधी पक्षनेते पद मिळवले आहे. तेथे त्यांचे 25 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. पण एवढ्यानेच आपली राजकीय ताकद गुजरातमध्ये प्रचंड वाढल्याचा आव आम आदमी पार्टीने आणला आहे.
उत्तराखंडात कोणत्याही निवडणुकीत आम आदमी पार्टीने अद्याप तरी फार मोठा तीर मारलेला नाही. तरी देखील आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांच्या राजीनाम्याचे श्रेय स्वतःच्याच ट्विटर हॅण्डलवर ट्विट करून ओढून घेतले आहे.
BJP changes Uttarakhand, Gujarat CM; The Aam Aadmi Party took credit for itself
महत्त्वाच्या बातम्या
- आकाशावर लक्ष ठेवण्यासाठी हवाई दलाला मिळणार सहा विमाने, अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर
- भाषिक कट्टरता धोकादायक, हिंदी अधिकृत भाषा नसणाऱ्या राज्यांशी केंद्राने साधावा इंग्रजीमध्ये संवाद, मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश
- लस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारचा बडगा, 15 सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश
- वर्क फ्रॉम होम नको रे बाप्पा..! तातडीने वर्क फ्रॉम ऑफिस सुरु न केल्यास लग्न टिकणारच नसल्याने कर्मचार्याच्या पत्नीचे उद्योगपतीला साकडे