विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपने तामिळनाडूच्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली असून फायर ब्रँड नेते अण्णामलाई कोईमतूर मधून लोकसभेच्या मैदानात उतरवले आहेत. त्याचबरोबर तेलंगणाच्या माजी राज्यपाल तामिळसाई सुंदरराजन यांना भाजपने चेन्नई दक्षिणमधून लोकसभेचे तिकीट दिले आहे. bjp candidature from South Chennai, Dr Tamilisai Soundararajan tamilnadu
तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत, त्यापैकी भाजपने 10 जागा पीएमकेला दिल्या आहेत.
भाजपचे उमेदवार असे :
दक्षिण चेन्नई : तामिळसाई सुंदरराजन, सेंट्रल चेन्नई : विनोज पी. सेल्वम, वैल्लोर (एस्सी) : षणमुगम, कृष्णागिरी : सी. नरसिंहा, नीलगिरी : एल. मुरुगन, कोईमतूर : के. अण्णामलाई, पेरंबदूर : टी. आर. पारिवेंधर, थूथुकुडी नयनार, नागेंद्रन कन्याकुमारी : पी. राधाकृष्णन
भाजपने 2 मार्च रोजी पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नावे होती.
त्याच वेळी, भाजपची दुसरी यादी 13 मार्च रोजी आली, ज्यात 72 नावे होती. यामध्ये नागपूरमधून नितीन गडकरी, उत्तर मुंबईतून पीयूष गोयल आणि हमीरपूरमधून अनुराग ठाकूर यांना तिकीट देण्यात आले आहे.
bjp candidature from South Chennai, Dr Tamilisai Soundararajan tamilnadu
महत्वाच्या बातम्या
- CEC नियुक्ती कायद्यावर केंद्राचे उत्तर; पॅनेलमध्ये सरन्यायाधीश असणे म्हणजेच आयोग स्वतंत्र असे नाही
- राजकीय पक्षांच्या मोफत ‘भेटवस्तू’ देण्याच्या आश्वासनांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका
- सुरुवातीला पवार गटाची चलती, आता अजितदादांच्या कार्यकर्त्यांची कुरघोडी; युगेंद्र पवारांना घेराव!!
- EDने पंजाबमधील तुरुंगात असलेल्या AAP आमदारासह सहा जणांविरुद्ध दाखल केली फिर्याद