राष्ट्रवादी, अकाली आणि ‘टीडीपी’ही बैठकीसाठी येण्याची शक्यता
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपा आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने १८ जुलै रोजी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) बैठक बोलावली आहे. यामध्ये काही नवीन पक्ष सामील झाल्याची चर्चा आहे. दैनिक भास्करने यासंदर्भात वृत्त दिले आहे. BJP calls NDA meeting on July 18 Three party leaders will come from Bihar with Chirag Paswan
भाजपाचे लक्ष्य महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील ज्या नेत्यांनी आणि पक्षांनी गेल्या काही वर्षांत NDA सोडले आहे, त्यांच्यावर आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) यांना एनडीए मध्ये स्थान दिले जाईल. उत्तर प्रदेशमधून ओमप्रकाश राजभर यांच्या सुहलदेव भारतीय समाज पक्षाला एनडीएमध्ये आणल्याची चर्चा आहे. बिहारमध्ये जीतन राम मांझी यांची एचएएम, चिराग पासवानची एलजेपी (राम विलास), मुकेश साहनी यांची व्हीआयपी आणि उपेंद्र कुशवाहाची आरएलएसपी यांनाही पाचारण करण्यात आले आहे.
पंजाबमधील अकाली दल (बादल) आणि आंध्र प्रदेशमधून माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्ष (टीडीपी) मध्येही प्रवेश होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २३ जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह १५ पक्ष सहभागी झाले होते. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा उद्देश होता. १७ किंवा १८ जुलैला हे पक्ष पुन्हा एकदा बेंगळुरूमध्ये एकत्र येणार आहेत.
BJP calls NDA meeting on July 18 Three party leaders will come from Bihar with Chirag Paswan
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरमधील भूमिहीनांना जमीन देण्याच्या निर्णयाला विरोध, खोऱ्यातील नेत्यांना वाटतेय ही भीती
- WATCH : आता भगव्या रंगात दिसणार नवी वंदे भारत एक्स्प्रेस, रेल्वेमंत्री म्हणाले- तिरंग्यापासून घेतली प्रेरणा
- भारतात समान नागरी संहिता केवळ तत्त्वतःच शक्य, जावेद अख्तर यांचे मत
- गडचिरोली दौऱ्यावरून परतताना मुख्यमंत्री शिंदेंना दिसली रस्त्यावर बंद पडलेली रुग्णवाहिका, त्यानंतर…