• Download App
    Tamilnadu chief minister तामिळनाडूतली लोकसभा मतदारसंघ संख्या घटण्याची खोटी माहिती मुख्यमंत्र्यांनीच दिली; भाजपचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार!!

    तामिळनाडूतली लोकसभा मतदारसंघ संख्या घटण्याची खोटी माहिती मुख्यमंत्र्यांनीच दिली; भाजपचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार!!

    वृत्तसंस्था

    चेन्नई : तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सरकारचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी केंद्रातल्या मोदी सरकारच्या त्रिभाषीय शैक्षणिक धोरणाविरुद्ध तामिळनाडूमध्ये रान पेटवले असताना भाजपचे तिथले प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला आहे. तामिळनाडूतली लोकसभा मतदारसंघ संख्या घटण्याची रस्त्याची कपोलकल्पित आणि चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांनीच जनतेमध्ये पसरवली. त्यांनी हिंदी भाषेविरुद्ध तमिळ जनतेच्या मनात द्वेष भावना फैलावली, असा आरोप अण्णामलाई यांनी लिहिलेल्या पत्रात केला आहे. Tamilnadu chief minister

    केंद्रातील मोदी सरकारने भारतामधल्या मातृभाषांना शैक्षणिक पातळीवर प्रोत्साहन देण्यासाठी त्रिभाषीय शैक्षणिक धोरण अंमलात आणले त्या धोरणानुसार इंजीनियरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना देखील मातृभाषेत शिक्षण घेण्याची सोय केली. इंग्रजी हिंदी आणि स्थानिक मातृभाषा या तीनही भाषा शिकवण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर प्रोत्साहन दिले. मात्र 2026 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी जुन्या द्रविडी राजकारणाला हवा देत हिंदी भाषेविरुद्ध द्वेषभावना पसरवणारे आंदोलन सुरू केले. उत्तर प्रदेश, बिहार ही राज्ये देखील हिंदी भाषी नव्हती. पण हिंदी आणि संस्कृत या दोन भाषांनी स्थानिक पातळीवरच्या 25 भाषा खाल्ल्या, असा आक्रस्ताळा आरोप स्टालिन यांनी केला.

    पण त्यापलीकडे जाऊन तामिळनाडू मधली लोकसभा मतदारसंघांची संख्या 39 वरून 31 वर येईल, अशी भीती तमिळ जनतेला दाखवली. तामिळनाडूने लोकसंख्या मर्यादित ठेवण्यात यश मिळवले, पण त्याचा फटका लोकसभा मतदारसंघ कमी होण्यात बसेल, असा दावा स्टालिन यांनी केला.

    मात्र अण्णामलाई यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हे सगळे आरोप खोडून काढलेच, पण त्याच वेळी मोदी सरकारने तमिळ भाषेसाठी आणि अन्य मातृभाषांसाठी कोणते धोरण अवलंबले याची सविस्तर माहिती त्या पत्रात दिली. जिसकी जितनी आबादी, उतनी उसकी हिस्सेदारी हे INDI आघाडीचे धोरण आहे. त्या आघाडीने सत्ताधारी असताना 2004 ते 2014 काळात तमिळ जनतेला आर्थिक अधिकारांपासून वंचित ठेवले. तमिळनाडूला देशातल्या अर्थव्यवस्थेतला योग्य तो वाटा कधीच दिला नाही. त्या INDI आघाडीत राहून मुख्यमंत्री भाजप सरकारवर खोटे आरोप करतात, असा टोला अण्णामलाई यांनी हाणला. तमिळ – काशी संगम, महाकवी सुब्रमण्यम भारती यांचा जन्मदिवस राष्ट्रीय भाषा दिन म्हणून साजरा करणे, हे उपक्रम मोदी सरकारने सुरू केले. मलेशियातल्या विद्यापीठात तमिळ चेअर सुरू केली. तमिळ जनतेला मुख्यमंत्र्यांनी मात्र खोटी माहिती दिली. केवळ जनतेच्या भावना भडकवण्यासाठी ५ मार्चची सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यावर भाजप बहिष्कार घालेल, असे अण्णामलाई यांनी या पत्रात स्पष्ट केले.

    BJP boycot all party meeting convened by Tamilnadu chief minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले