विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 132 आमदार मिळवल्यानंतर भाजपने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडून काढून घेऊन स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी भाजप घटनेची निवड उद्या मुंबईत होणार असून भाजपचे दोन केंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन इथे येत आहेत.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री राहिलेले विजय रूपाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्ती मानले जातात. गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर ते भाजपचे पंजाब मधले प्रभारी बनले. भाजपने त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची निवड सोपविली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामती लोकसभा क्लस्टरच्या प्रभारी होत्या. त्या बारामतीतून सरप्राईज कॅंडिडेट असणार अशी चर्चा माध्यमांमधून त्यावेळी रंगली होती. परंतु स्वतः निर्मला सीतारामन यांनीच लोकसभा निवडणूक लढवायला नकार दिला होता. विजय रुपाने यांच्याबरोबरच निर्मला सीतारामन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीत सहभागी होणार आहेत.
दरम्यानच्या काळात आज सागर बंगल्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रवीण दरेकर, गिरीश महाजन आदी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामार्फत होणार असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिले आहेत. परंतु, विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्याकडे असलेल्या चिठ्ठी मध्ये फडणवीस यांचे नाव असेल की दुसरेच कुठले तरी सरप्राईज नाव असेल, याबाबत माध्यमांकडे अधिकृत कुठलीही माहिती नाही.
BJP appoints Vijay Rupani, Nirmala Sitharaman as central observers for Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Sadabhau Khot सदाभाऊ खोतांचा बाबा आढावांना सवाल- मुस्लिमबहुल भागात महायुतीला कमी मते मिळतात, तिथे EVM मविआसाठीच कसे सेट होते?
- Manoj Jarange : भाजप महायुतीला कौल देऊन जनतेने दाखवली सत्तेची दिशा; पण जरांगेंची सरकारच्या मुंडक्यावर पाय द्यायची भाषा!!
- Haryana government गायी पाळणाऱ्यांना ‘हे’ सरकार देत आहे 30 हजार रुपये
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांवरील हल्ल्याच्या घटनेवर भाजपचा मोठा दावा!