• Download App
    Ravi Shankar Prasad दिल्लीत मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपकडून रविशंकर प्रसाद, ओमप्रकाश धनखड यांची निरीक्षक पदी नियुक्ती!!

    दिल्लीत मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपकडून रविशंकर प्रसाद, ओमप्रकाश धनखड यांची निरीक्षक पदी नियुक्ती!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीत मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि ओमप्रकाश धनखड यांची आज दुपारी निरीक्षक पदी नियुक्ती केली. दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाची आज सायंकाळी सात वाजता बैठक होणार असून या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाची निवड होणार आहे त्यासाठी रविशंकर प्रसाद आणि ओमप्रकाश धनखड भाजपचे केंद्रीय निरीक्षक हजर राहतील. हे दोन्ही नेते सर्व आमदारांशी चर्चा करून नव्या नेत्याची निवड करतील.

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा पराभव करून भाजपने 48 जागा जिंकल्या. त्यामुळे उद्या भाजपचे बहुमताचे सरकार स्थापन होणार आहे उद्या दुपारी १२.४५ वाजता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा रामलीला मैदानावर शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून त्याआधी भाजपा विधिमंडळ नेत्याची निवड आज सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे.

    दिल्लीचे मुख्यमंत्री पदासाठी प्रवेश वर्मा, विजेंद्र गुप्ता, मनोज तिवारी, रेखा गुप्ता आदी नेत्यांची नावे माध्यमांच्या चर्चेत आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे ट्रॅक रेकॉर्ड बघता दिल्लीला यापेक्षा वेगळा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी मिळू शकतो, अशी देखील दबक्या आवाजात चर्चा आहे.

    BJP appoints Ravi Shankar Prasad, Omprakash Dhankhar as observers to elect Chief Minister in Delhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India : भारताची अमेरिकेतील निर्यात सलग तिसऱ्या महिन्यात घसरली; ऑगस्टमध्ये निर्यात 16.3% घसरून 58,000 कोटींवर

    Hindenburg : हिंडेनबर्ग प्रकरणी सेबीची अदानींना क्लीन चिट; अदानी ग्रुपवर मनी लाँड्रिंगचा आरोप, मार्केट व्हॅल्यू 1 लाख कोटींनी कमी झाले

    Anil Ambani : अनिल अंबानींविरुद्ध सीबीआयने दाखल केले आरोपपत्र; येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्यावरही 2,796 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप