वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील कथित हिंसाचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे 13 नेते स्वतःच दुटप्पी आहेत. ते बंगाल आणि राजस्थान मधल्या हिंसाचाराबद्दल बद्दल मूग गिळून गप्प बसतात, असा पलटवार भाजपने केला आहे. BJP Answer: 13 leaders questioning Modi; Bengal-Rajasthan silent on violence !!
ममता बॅनर्जी शरद पवार यांच्यासह 13 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशभरातील हिंसाचाराच्या घटनांबद्दल आपण गप्प का?, असा सवाल केला आहे. त्या मुद्द्यावर भाजपने आज सविस्तर उत्तर दिले आहे. भाजपच्या राजवटीत जिथे हिंसाचार होतो, तेथे गुंड माफिया यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई होते. मध्य प्रदेशातले उदाहरण द्यायचे झाले, तर खरगोन मध्ये रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या गुंड माफियांच्या घरांवर मध्यप्रदेश सरकारने कायदेशीर कारवाई करून बुलडोजर चालवले. परंतु, राजस्थानात करौली हिंसाचारात प्रमुख आरोपी असलेला मुलतबा अहमद हा बऱ्याच वर्षापासून फरार आहे. त्याला राग पकडण्यात राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारला अपयश आले आहे. याबद्दल विरोधी पक्षांचे 13 नेते मूग गिळून गप्प आहेत, असा आरोप भाजपने केला आहे.
त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन देशातील हिंसाचार याबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. पण त्या स्वतः ज्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत, त्या पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराने कळस गाठला आहे. रोज राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. हिंदू समाजाला टार्गेट करण्यात येत आहे. परंतु, त्याविषयी स्वतः ममता बॅनर्जी आणि त्यांच्याबरोबर असे 12 नेते एक अवाक्षरही बोलायला तयार नाहीत, असा आरोप भाजपचे प्रवक्ते राहुल भाटिया यांनी केला आहे.
काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचे नेते नेहमीच हिंसाचाराबद्दल दुटप्पी भूमिका घेतात. किंबहुना त्यांची भूमिका ही मुस्लिम लांगुलचालनाची असते. त्यांना कुठलाही हिंसाचार फक्त एकतर्फी दिसतो आणि हिंदू समाजाला टार्गेट करायचे असते, असा टोलाही गौरव भाटिया यांनी लगावला आहे.
BJP Answer : 13 leaders questioning Modi; Bengal-Rajasthan silent on violence !!
महत्त्वाच्या बातम्या
- दक्षिणेतील काही राज्यांत पावसाची शक्यता
- आता उष्ण वातावरणातही टिकणाऱ्या लसीवर संशोधन कोल्ड चेन स्टोरेज नसलेल्या देशांसाठी दिलासा
- खासदार हरभजन सिंग यांचा स्तुत्य उपक्रम : म्हणाले – राज्यसभेतून मिळणारा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी खर्च करणार
- केरळमध्ये RSS कार्यकर्त्याची हत्या : गुंडांनी श्रीनिवासन यांच्यावर तलवारीने 20 वार केले, पलक्कड शहरातील मध्यवस्तीत दिवसाढवळ्या हत्या