हरियाणातून किरण चौधरी, राजस्थानमधून रवनीत सिंह बिट्टू; जाणून घ्या, महाराष्ट्रातून कोण? BJP announced 9 candidates for Rajya Sabha elections
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नऊ राज्यांमधील राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 12 पैकी 11 जागांवर निवडणूक लढवत आहे.
भाजपने मंगळवारी 9 जागांसाठी उमेदवार जाहीर केले. बिहारमधील एक जागा उपेंद्र कुशवाह आणि महाराष्ट्राची जागा अजित पवार यांच्या पक्षाला देण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू राजस्थानमधून निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांना खासदारकीचे उमेदवार केले आहे. याशिवाय किरण चौधरी हरियाणामधून, ममता मोहंता ओडिशातून निवडणूक लढवणार आहेत. त्रिपुरातून राजीव भट्टाचार्य, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, बिहारमधून मनन कुमार मिश्रा राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. आसाममधून रंजन दास यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
BJP announced 9 candidates for Rajya Sabha elections
महत्वाच्या बातम्या
- Eknath shinde : मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता
- Narendra modi :पंतप्रधान मोदी जगाला चकित करणार, रशियानंतर आता थेट युक्रेनला जाणार!
- Monkey Pox Principal Secretary : ‘मंकी पॉक्स’बाबत मोठी बैठक, प्रधान सचिव म्हणाले परिस्थितीवर पंतप्रधानांची नजर!
- Vishwa Hindu Parishad : मागासवर्गीयांना आपलेसे करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची देशभरात तब्बल 9000 ब्लॉक मध्ये धर्मसभा आणि संमेलने!!