• Download App
    जवाहरलाल नेहरू संग्रहालयाच्या नामांतरावरून भाजपा आणि काँग्रेस आमनेसामने BJP and Congress face to face over renaming of Jawaharlal Nehru Museum

    जवाहरलाल नेहरू संग्रहालयाच्या नामांतरावरून भाजपा आणि काँग्रेस आमनेसामने

    जेपी नड्डा आणि मल्लिकार्जुन खर्गेंची विधानं आली आहेत समोर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  दिल्लीतील नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी असे नामकरण केल्यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. याच इमारतीच्या आवारात पंतप्रधान संग्रहालय सुरू होऊन सुमारे वर्षभरानंतर तीन मूर्ती भवनमधील संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे अधिकृत निवासस्थान म्हणजे तीन मूर्ती भवन होते. BJP and Congress face to face over renaming of Jawaharlal Nehru Museum

    काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष देशाच्या पहिल्या पंतप्रधानांच्या योगदानाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. खर्गे यांनी ट्विट केले की, “ज्यांना इतिहास नाही, ते इतरांचा इतिहास पुसून टाकायला निघाले आहेत! यातून फक्त भाजप-आरएसएसची खालची मानसिकता आणि हुकूमशाही प्रवृत्ती दिसून येते. मोदी सरकारची बटू विचारसरणी ‘हिंदच्या जवाहर’चे भारतातील मोठे योगदान कमी करू शकत नाही!

    भाजपाने संग्रहालयाच्या नावातील बदलाचे समर्थन केले आहे आणि काँग्रेसला या मुद्द्यावर राजकारण करणे थांबवण्यास सांगितले आहे. भाजपाचे प्रमुख जेपी नड्डा यांनी काँग्रेसच्या हल्ल्याला राजकीय अपचनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हटले आहे. जेपी नड्डा यांनी ट्विट केले, एक साधारण तथ्य स्वीकार करण्यास असमर्थ आहे की, एका घरण्यापलीकडे असे नेते आहेत, ज्यांनी आपल्या देशाची सेवा आणि याचे निर्माण केले आहे. पंतप्रधान संग्रहालय राजकारणापलीके एक प्रयत्न आहे आणि काँग्रेसकडे ते अनुभवण्याची दृष्टी नाही.

    BJP and Congress face to face over renaming of Jawaharlal Nehru Museum

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!