तर हा 2025मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘राजद’साठी तो मोठा धक्का ठरू शकतो.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : NEET घोटाळ्याची धग आता बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यापर्यंत पोहोचताना दिसत आहे. NEET घोटाळ्यात, तेजस्वी यादवचे पीए प्रीतम यादव, ज्यांचे नाव एनएचएआय गेस्ट हाऊसमध्ये आरोपींना खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी समोर येत आहे, ते तेजस्वीच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक आहे.BJP alleges that Tejashwi Yadav is also involved in NEET scam demands inquiry
प्रीतम यादव यांनीच आपल्या स्तरावर आरोपींना राहण्यासाठी जागा उपलब्ध करण्याचे काम केले नसेल, यामागे तेजस्वी यादव असू शकतात. असा आरोप भाजपने केला आहे. NEET घोटाळ्यातील तेजस्वी यादव यांच्या भूमिकेची थेट चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे.
याआधीही आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांना जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या दिल्याच्या आरोपांनी घेरले आहे. या प्रकरणी तेजस्वी यादव यांची कोणतीही भूमिका समोर आली तर 2025 मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राजदसाठी तो मोठा धक्का ठरू शकतो.
राष्ट्रीय जनता दल आणि त्यांचे नेते नेहमीच भ्रष्टाचारात गुंतले आहेत, असा आरोप भाजप नेते जयराम विप्लव यांनी केला. राजद नेते लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना बिहारमधील गरीब तरुणांना जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या देऊन भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांनी केला. तर आता भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, NEET वादात प्रीतम यादव यांचा कट ज्या प्रकारे समोर आला आहे, त्यावरून या वादात बड्या नेत्यांचा हात असेल, असे संकेत मिळत आहेत. त्यांच्या पाठिंब्याशिवाय प्रीतम यादव स्वतःहून हा भ्रष्टाचार करू शकले नसते. याप्रकरणी तेजस्वी यादव यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे.
BJP alleges that Tejashwi Yadav is also involved in NEET scam demands inquiry
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार