वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 80000 च्या बिटकॉइन मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्याचे धागेदोरे संयुक्त अरब अमिराती आणि चीन मध्ये आढळले आहेत. आरोपी भारव्दाज बंधूंच्या स्टेटमेंटमधून ही माहिती उघड झाली आहे. पण आरोपी परस्पर विरोधी स्टेटमेंट देऊन तपास संस्थेची दिशाभूल करीत आहेत, असे सक्तसवूली संचलनालय अर्थात ईडीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले. Bitcoin scam : Bitcoin scam run by Indians from Singapore with footprint in UAE and China
भारव्दाज बंधू अमित विवेक आणि अजय यांनी आपले वडील महेंद्र भारव्दाज यांच्या मदतीने क्लाऊड मायनिंग खरेदीचा घाट घातला. त्याची किंमत बिटकॉइनच्या रूपाने चुकविण्याचा वायदा केला. त्यासाठी बिटकॉइनच्या रूपात काही रक्कम गोळा देखील केली. पण नंतर बिटकॉइन पुरवठादारांनी हात वर केले. यातून 80000 बिटकॉइनचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा बाहेर आला आहे.
भारव्दाज यांची सिंगापूरमध्ये कंपनी आहे. तिच्यामार्फत क्लाऊड मायनिंगचा व्यवहार होत होता. पण आता बिटकॉइनमधून होणाऱ्या या व्यवहाराचे धागेदोरे यूएई आणि चीनमधल्या कंपन्यांशी जोडले असल्याचे लक्षात आले आहे, असे ईडीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात सांगितले.
या व्यवहारासाठी अजय भारव्दाज आणि आदिती भारव्दाज यांनी चीनला भेट दिल्याची माहिती देखील पुढे आली आहे. इतकेच काय पण अजय भारव्दाज संचालक असलेल्या दुबईतील कंपनीला कन्सलटन्सी म्हणून एबी रिसर्च कंपनीला शेफील्ड होल्डिंगकड़ून 383744 दिराम मिळाले असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे. आधी या कंपनीशी आपला संबंध असल्याचे अजय भारव्दाज यांनी नाकारले होते. पण ज्यावेळी ईडीच्या तपास अधिकाऱ्यांनी कागदपत्रांचा हवाला दिला, त्यावेळी अजय भारव्दाज यांनी संबंधित व्यवहाराची कबूली दिली आहे. या बिटकॉइन घोटाळ्याचा पुढील तपास ईडी करीत आहे. यामध्ये आणखी काही महत्त्वाची नावे पुढे येण्याची शक्यता देखील ईडीने वर्तविली आहे.
Bitcoin scam : Bitcoin scam run by Indians from Singapore with footprint in UAE and China
महत्त्वाच्या बातम्या
- पाच दिवसात काही जिल्ह्यात उष्णतेची लाट : ११ जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जाहीर
- Sharad Pawar : आयुष्यभर आगीच लावल्या, शरद पवारांचे आडनाव बदलून आगलावे करा; सदाभाऊ खोत यांचे शरसंधान!!
- स्वप्नील जोशी-श्रेयस तळपदे ठरले मानधन वीर; एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात ?
- पहिल्या झटक्यात आश्वासन पूर्ती : गोव्यात डाॅ. प्रमोद सावंत सरकार देणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत!!