• Download App
    वाढदिवसाचे सेलिब्रेशन इस्लाम मध्ये हराम; देवबंदचे उलेमा असद काज़मींचे वक्तव्य birthday celebration haram in islam

    वाढदिवसाचे सेलिब्रेशन इस्लाम मध्ये हराम; देवबंदचे उलेमा असद काज़मींचे वक्तव्य

    वृत्तसंस्था

    लखनौ : वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणे ही ख्रिश्चनांची पद्धती आहे. मुसलमानांनी ती फॉलो करू नये. वाढदिवसाचे सेलिब्रेशन हे इस्लाम मध्ये हराम मानले गेले आहे, असे वक्तव्य देवबंदचे उलेमा असद काज़मी यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशन वरून असद काजमी यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनाचा, कुराण आणि हदीसचा संदर्भ दिला आहे. असद काज़मी यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे. birthday celebration haram in islam

    मोहम्मद पैगंबर यांनी आपल्या जीवनभरात कधीही वाढदिवस साजरा केला नाही. कुराण आणि हदीस मध्ये देखील वाढदिवस साजरा करण्याचा उल्लेख नाही. वाढदिवस साजरा करणे ही ख्रिश्चनांची पद्धत आहे. त्यामुळे मुस्लिमांनी ती पद्धत फॉलो करू नये. इस्लाम मध्ये वाढदिवस सेलिब्रेशन हराम मानले गेले असल्यामुळे तसले सेलिब्रेशन करू नये. अन्यथा कयामतच्या दिवशी मुस्लिमांना त्याचा जबाब द्यावा लागेल, असा इशारा असद काज़मी यांनी दिला आहे.



    बुलंदशहरच्या उलेमांनी निकाहाच्या वेळी डीजे लावणे हे देखील हराम असल्याचे म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याला हदीस आणि शरियत यांचा हवाला देत असद काज़मी यांनी पाठिंबा दिला आहे. निकाहच्या वेळी डीजे लावणे, घोड्यावर बसणे हे इस्लामी कायद्यानुसार हरामच आहे. त्यामुळे त्या पद्धतीचे सेलिब्रेशन देखील करू नये, असे असद काज़मी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियात जोरदार वादविवाद सुरू झाला आहे.

    birthday celebration haram in islam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहा म्हणाले- ममता बंगालमध्ये घुसखोरी थांबवू शकत नाहीत, आमचे सरकार आले तर पक्षीही फिरकू शकणार नाही

    RBI Report FY25, : देशात आता 2.51 लाख ATM; वर्षभरात 2,360 ATM बंद; डिजिटल पेमेंट वाढल्याचा परिणाम