• Download App
    माणसाला बर्ड फ्लूच्या संसर्गाचा धोका तसा कमीच, घाबरून न जाण्याचे डॉक्टराचे आवाहन। Bird flue is not dangerous for human

    माणसाला बर्ड फ्लूच्या संसर्गाचा धोका तसा कमीच, घाबरून न जाण्याचे डॉक्टराचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात प्रथमच माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अशा प्रकारच्या घटना या दुर्मिळ असून लोकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नसल्याचे एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. Bird flue is not dangerous for human

    यंदा जानेवारी महिन्यात अनेक भागांत बर्ड फ्लूने डोके वर काढल्यानंतर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाना आणि छत्तीसगडमधील पोल्ट्री चालकांना लाखो पक्ष्यांची कत्तल करावी लागली होती. बर्ड फ्लूच्या विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने स्थलांतरित पक्ष्यांमुळे होतो असे गुलेरिया यांनी स्पष्ट केले.



    या विषाणूंचा पक्ष्यांपासून माणसाला संसर्ग होण्याचा धोका फार कमी असून माणसापासून माणसाला त्याची बाधा होण्याची अद्याप एकही घटनासमोर आलेली नाही, त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नसल्याचे गुलेरिया यांनी सांगितले.

    ‘‘ कोंबडीचे मांस किंवा अंडी खाण्यापूर्वी ती योग्यरीत्या शिजवून घ्यायला हवीत. अशाप्रकारे शिजविलेल्या मांसातून विषाणूची बाधा झाल्याची कोणतीही घटना उघड झालेली नाही. तुम्ही मांस शिजवता तेव्हाच त्यातील विषाणू मरण पावतात. बाधित कोंबड्या, आजारी किंवा मरण पावलेल्या कोंबड्यांपासून मात्र दूर राहायला हवे.’’

    Bird flue is not dangerous for human

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली