• Download App
    Bipin Rawat Helicopter Crash : 'जळत्या हेलिकॉप्टरमधून तिघांनी घेतल्या उड्या, कुन्नूर दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शीची माहिती|Bipin Rawat Helicopter Crash 3 people jumped from a burning helicopter, eyewitness of Coonoor accident told

    Bipin Rawat Helicopter Crash : ‘जळत्या हेलिकॉप्टरमधून तिघांनी घेतल्या उड्या, कुन्नूर दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शीची माहिती

    तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्यासह १४ जण होते. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.Bipin Rawat Helicopter Crash 3 people jumped from a burning helicopter, eyewitness of Coonoor accident told


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्यासह १४ जण होते. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

    लष्कर आणि स्थानिक पोलीस अधिकारी अपघातस्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेची माहिती दिली. कृष्णसामी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मोठा आवाज ऐकला. यानंतर ते घरातून बाहेर आले तर त्यांना दिसले की, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर हेलिकॉप्टर आदळल्याने आगीचे लोळ उठले होते.



    पुढे ते म्हणाले की, हेलिकॉप्टर झाडावर आदळत असताना त्याला आग लागली होती. यादरम्यान 2-3 जणांना हेलिकॉप्टरमधून उड्या मारताना पाहिले, सर्वांच्या अंगाला आग लागली होती. कृष्णसामी यांनी आपल्या साथीदारांना एकत्र केले आणि बचावकार्य सुरू केले. सापडलेल्या सर्व मृतदेहांपैकी ते 80 टक्के जळालेले आहेत.

    वेलिंग्टनला जात होते सीडीएस रावत

    सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. भारतीय हवाई दलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघाताबाबत कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. एम सीरीजचे हे हेलिकॉप्टर सीडीएस जनरल बिपिन रावत यांना वेलिंग्टनमधील डिफेन्स स्टाफ कॉलेजमध्ये घेऊन जात होते.

    कोईम्बतूरमधील अधिकृत सूत्रांनी सांगितले की, डोंगराळ निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळील कट्टेरी-नुनचप्पानाचत्रम भागात कोसळलेल्या हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्याखालून 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले.

    अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दाट धुक्यामुळे कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर जंगलात कोसळले असावे. दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस रावत यांच्या निवासस्थानी भेट दिली. ते उद्या या घटनेबाबत संसदेला माहिती देणार आहेत.

    Bipin Rawat Helicopter Crash 3 people jumped from a burning helicopter, eyewitness of Coonoor accident told

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची