• Download App
    नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला बिजू जनता दल राहणार हजर; समाजवादी रामगोपाल यादवांचाही वेगळा सूर Biju Janata Dal residents attend the inauguration of the new Parliament House

    नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला बिजू जनता दल राहणार हजर; समाजवादी रामगोपाल यादवांचाही वेगळा सूर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नवीन संसद भवनाचे उद्घाटन येत्या 28 मे 2023 रोजी सावरकर जयंती दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्यामुळे त्या समारंभावर काँग्रेस सह बाकीच्या विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे, पण आता या बहिष्कारामध्ये देखील फाटाफूट झाली असून ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी वेगळा सूर लावला आहे. Biju Janata Dal residents attend the inauguration of the new Parliament House

    ओरिसातील सत्ताधारी बिजू जनता दलाचे खासदार उद्घाटन समारंभाला हजर राहणार आहेत. तसे पत्रकच नवीन पटनाईक यांच्या स्वाक्षरीने बिजू जनता दल पक्षाने काढले आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी देखील नवीन संसद भवन हे सर्व भारतीयांचे आहे. भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याचे उद्घाटन केवळ पंतप्रधान करणार म्हणून त्या समारंभावर बहिष्कार घालणे योग्य नाही, असे वक्तव्य केले आहे.

    अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष अधिकृतरित्या विरोधकांच्या बहिष्कारात सामील झाला आहे. पण त्यांचेच खासदार रामगोपाल यादव यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे. त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर काँग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी, तेलगू देशमचे नेते चंद्राबाबू नायडू या नेत्यांनी अद्याप तरी उद्घाटन समारंभावर बहिष्कार घातलेला नाही.

    Biju Janata Dal residents attend the inauguration of the new Parliament House

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pinaka Guided Rocket : भारताच्या पिनाका रॉकेटची चाचणी यशस्वी; 120 किमी रेंज, लक्ष्यावर अचूक हल्ला केला

    Amit Shah : अमित शहा म्हणाले- ममता बंगालमध्ये घुसखोरी थांबवू शकत नाहीत, आमचे सरकार आले तर पक्षीही फिरकू शकणार नाही

    RBI Report FY25, : देशात आता 2.51 लाख ATM; वर्षभरात 2,360 ATM बंद; डिजिटल पेमेंट वाढल्याचा परिणाम