• Download App
    बिहारचे पडसाद मणिपूरमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू मध्ये फूट; सर्व आमदार भाजपच्या गोटात सामील!!Bihar's failure splits Nitish Kumar's JDU in Manipur

    बिहारचे पडसाद मणिपूरमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू मध्ये फूट; सर्व आमदार भाजपच्या गोटात सामील!!

    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेऊन तेजस्वी यादव यांच्याबरोबर नवा राजकीय घरोबा केला. त्याचे पडसाद मणिपूरमध्ये उमटले असून मणिपूरमध्ये नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल जेडीयू फुटला आहे. जेडीयूचे 6 आमदार त्यांच्या पक्षातून बाहेर पडून भाजपच्या गोटात सामील झाले आहेत. Bihar’s failure splits Nitish Kumar’s JDU in Manipur

    या मुद्द्यावर नितीश कुमार यांनी भाजपला घेरले आहे. भाजप दुसऱ्या पक्षांमध्ये फाटाफूट घडवून असंवैधानिक पत्र कृत्य करतो आहे. आम्ही न्यायालयात दाद मागू, असे वक्तव्य नितीश कुमार यांनी केले आहे, तर नितीश कुमार यांच्या वक्तव्याला माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार सुशीलकुमार मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    मणिपूर मध्ये जेडीयू फुटल्याने तो पक्ष तिथेच संपुष्टात आला आहे. बिहारमध्ये देखील लवकरच जेडीयू – राष्ट्रीय जनता दल आघाडी तुटेल, असे भाकीत सुशील कुमार मोदी यांनी केले आहे. मूळात नितीश कुमार आणि भाजप यांनी एकत्र येऊन जनतेकडे कौल मागितला होता. जनतेने 5 वर्षांसाठी जेडीयू – भाजप आघाडीला कौल दिला होता. पण नितीश कुमार यांनी विश्वासघात करून तेजस्वी यादव यांच्याबरोबर हात मिळवणे केली. बिहारमध्ये लवकरच ही नवी आघाडी पण फुटेल. कारण नितीश कुमार यांच्या पक्षातल्या बहुसंख्या आमदारांना त्यांचा निर्णय आवडलेला नाही, असे भाकीत सुशीलकुमार मोदी यांनी केले आहे.

    Bihar’s failure splits Nitish Kumar’s JDU in Manipur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य