• Download App
    Bihar बिहार मध्ये तेजस्वीचे तेज फिके, कन्हैयाची बासरी फुटली, राहुलची vote chori फसली!!

    बिहार मध्ये तेजस्वीचे तेज फिके, कन्हैयाची बासरी फुटली, राहुलची vote chori फसली!!

    नाशिक : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे निवडणूक आयोगाने दिलेले कल लक्षात घेता बिहारमध्ये तेजस्वीचे तेज फिके, कन्हैयाची बासरी फुटली आणि राहुलची vote chori फसली, अशाच शब्दांनी वर्णन करावे लागेल.

    कारण सकाळी 10.00 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कलानुसार सत्ताधारी जनता दल युनायटेड 58, भाजप 50, राष्ट्रीय जनता दल 30, लोक जनशक्ती रामविलास पासवान पार्टी 11, काँग्रेस 10 हिंदुस्थान अवाम मोर्चा 4 आणि अन्य 6 जागांवर आघाडीवर होते.

    याचा अर्थच तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी सत्ताधारी जनता दल युनायटेड आणि भाजप यांच्याविरुद्ध केलेला सगळा प्रचार फोल गेला. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच करिष्मा चालला. राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा बिहारी जनतेवर प्रभाव पाडू शकली नाही. राहुल गांधींचा vote chori चा आरोप बिहारी मतदारांनी वाया घालविला. तेजस्वी यादव यांचे यादव + मुस्लिम बेरजेचे राजकारण मर्यादेपलिकडे यशस्वी होऊ शकले नाही.

    – महिला आणि Gen Z चा कल नितीश + मोदींकडे

    बिहारमध्ये महिला आणि Gen z यांचे तब्बल 10 % वाढलेले मतदान सत्ताधारी आघाडीच्याच बाजूने गेले. मग भले लिब्राल लोकांनी बिहारी महिलांनी 10 हजार रुपयांसाठी मतदान केले, असे वर्णन केले तरी त्याने बिहारी महिलांना फरक पडला नाही. बिहारच्या महिलांनी जातीवादाच्या पलीकडे जाऊन नितीश – मोदी जोडगोळीच्या पारड्यात भरभरून मते टाकली.

    – Gen Gen Z चा कौल घराणेशाहीच्या विरोधात

    ज्या Gen Z च्या भरवशावर राहुल गांधींनी काँग्रेसला बिहारची अख्खी निवडणूक लढवायला लावली, त्या Gen Z ने काँग्रेसच्या आणि राष्ट्रीय जनता दलाच्या घराणेशाहीच्या विरोधात कौल दिला. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या घराणेशाहीला केरात घातले. राहुल गांधी यांच्या काँग्रेसशी आघाडी करून तेजस्वी यादव यांना काही फायदा झाला नाही. त्याचबरोबर कम्युनिस्टांच्या कळपातून काँग्रेसमध्ये ओढून आणलेल्या कन्हैया कुमारचा सुद्धा काँग्रेसला काही फायदा झाला नाही. दोघांचेही लॉन्चिंग आणि रीलॉन्चिंग फेल गेले. बिहारच्या समस्त जनतेने राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यावर विश्वास ठेवला नाही.

    Bihar rejected tejasvi Yadav Rahul Gandhi and Kanhaiya Kumar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहार निकाल 9.30; भाजप 33 जेडीयू 24 आरजेडी 20 लोक जनशक्ती 8, काँग्रेस 5!!

    Al-Falah University : दिल्ली स्फोटाचे अल-फलाह विद्यापीठ कनेक्शन; अरब देशांकडून निधी, चांसलरवर फसवणुकीचा आरोप

    Delhi Blast : दहशतवाद्यांना बाबरी पाडण्याचा बदला घ्यायचा होता; देशभरात 32 कारने स्फोट घडवण्याचा होता कट