• Download App
    बिहार : बँक खात्यात चुकून आले पाच लाख रुपये, परत करण्यास नकार दिल्याने अटक, म्हणाला- पैसे मोदींनी दिले, मग परत का करू!|Bihar man in jail for refusing to return Rs 5 lakh erroneously credited by bank, claims gift from Modi

    बिहार : बँक खात्यात चुकून आले पाच लाख रुपये, परत करण्यास नकार दिल्याने अटक, म्हणाला- पैसे मोदींनी दिले, मग परत का करू!

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारमध्ये बँकेच्या चुकीमुळे एका व्यक्तीच्या खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाले. पण हे पैसे परत करण्यास तो तयार नव्हता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि आता तो तुरुंगात आहे. या व्यक्तीचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पैसे त्याच्या खात्यावर पाठवले आहेत, मग मी का परत करावे?Bihar man in jail for refusing to return Rs 5 lakh erroneously credited by bank, claims gift from Modi

    वास्तविक, ही घटना आहे खगेरिया जिल्ह्यातील बख्तियारपूर गावाची. येथे रणजित दास नावाच्या व्यक्तीच्या खात्यात अचानक साडेपाच लाख रुपये आले. त्याने हे पैसे बँकेतून बाहेर काढले. जेव्हा बँकेला आपली चूक कळली, तेव्हा पैशांची परत मागणी करण्यात आली, परंतु त्याने नकार दिला. बँकेकडून वारंवार नोटीस देऊनही रणजितने पैसे परत केले नाहीत, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.



    रणजीत दास म्हणाला की, पीएम नरेंद्र मोदींनी त्याच्या खात्यात साडेपाच लाख रुपये पाठवले आहेत, त्यामुळे तो ते परत करणार नाहीत.रणजीतने नकार दिल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली. तो जवळच्या बख्तियारपूर गावाचा रहिवासी आहे. ग्रामीण बँकेने हा गुन्हा दाखल केल्याचे एसएचओ दीपक कुमार यांनी सांगितले. रणजीतला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

    या प्रकरणात आरोपीच्या गावकऱ्यांनी सांगितले की, जेव्हा रणजीत दासच्या खात्यात पैसे आले, तेव्हा लोकांनी त्याला बँकेला याबाबत माहिती देण्यास सांगितले होते. पण त्याने ऐकले नाही आणि आता तुरुंगात जावे लागले आहे.

    Bihar man in jail for refusing to return Rs 5 lakh erroneously credited by bank, claims gift from Modi

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार