• Download App
    बिहारमध्ये देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण; खोदकामाला होणार सुरुवात Bihar has the largest gold mine in the country; Excavation will begin

    बिहारमध्ये देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण; खोदकामाला होणार सुरुवात

    वृत्तसंस्था

    पाटणा : ज्याच्याकडे सर्वाधिक सोनं त्याचा आजूबाजूच्या लोकांमध्ये चांगलाच भाव वाढतो. त्यामुळेच सोन्याचे हे महत्व जाणून सोन्याच्या खाणीवर बेतलेल्या KGF सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर सोन्यासारखी कमाई केली. पण आता याच सिनेमाप्रमाणे बिहारच्या जमुई जिल्ह्यातून सोनं काढण्याची तयारी सुरू झाली आहे.
    Bihar has the largest gold mine in the country; Excavation will begin

    ही खाण देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण असल्याचे म्हटले जात आहे. बिहार राज्य सरकारकडून या खाणीतील सोनं काढण्यासाठी काम सुरू करण्यात येणार आहे. या खाणीतून खाणकाम करण्यासाठी लागणा-या सर्व परवानग्या बिहार सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

    222.88 मिलियन टन सोनं

    बिहारच्या या जमुई जिल्ह्यात तब्बल 222.88 मिलियन टन सोन्याचं भांडार असल्याचं भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणातून समोर आलं आहे. त्यामुळेच येथील जमिनीतून सोनं बाहेर काढण्यासाठी खाण व भूवैज्ञानिक विभाग तसेच राष्ट्रीय खनिज विकास निगमसह आणखी काही संस्था संयुक्तपणे काम करणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे.

    शोध सुरू होणार

    या जिल्ह्यातील करमाटिया, झाझा आमि सोनो या भागांमध्ये सोनं असल्याची माहिती मिळाल्याचे खाण आयुक्त हरज्योत कौर बम्हरा यांनी सांगितले आहे. पुढील महिन्याभरात राज्य सरकारकडून या भागांमध्ये सोन्याचा प्राथमिक शोध सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय संस्थेशी व अन्य काही संस्थांशी सामंजस्य करार करण्यात येणार असून, काही भागांत सामान्य स्तरावरही शोध मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचेही बम्हरा यांनी सांगितले आहे.

    …तर सोन्याचे दिवस येतील

    बिहार राज्यात देशातील सर्वाधिक सोन्याच्या खाणी असल्याची माहिती केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या वर्षी लोकसभा अधिवेशनात दिली होती. देशातील एकूण सोन्याच्या तुलनेत 44 टक्के सोनं हे एकट्या बिहारमध्ये असल्याची माहिती जोशी यांनी लेखी स्वरुपात दिली होती. त्यामुळे या खाणकामात सोनं सापडलं तर आपल्या देशात नक्कीच सोन्याचे दिवस येतील, असेही बोलले जात आहे.

    Bihar has the largest gold mine in the country; Excavation will begin

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

    Gold price : सोन्याच्या किमतींनी रचला नवा इतिहास, पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांच्या पुढे गेला