• Download App
    बिहारचा गँगस्टर माजी खासदार आनंद मोहनची तुरुंगातून सुटका; जी. कृष्णैया यांच्या पत्नी, मुलगी आणि आंध्र आयएएस असोसिएशनचा सुटकेला तीव्र विरोध|Bihar gangster former MP Anand Mohan released from jail; G. Krishnaiah's wife, daughter and Andhra IAS Association strongly opposed the release

    बिहारचा गँगस्टर माजी खासदार आनंद मोहनची तुरुंगातून सुटका; जी. कृष्णैया यांच्या पत्नी, मुलगी आणि आंध्र आयएएस असोसिएशनचा सुटकेला तीव्र विरोध

    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहार मधील गोपालगंज डिस्ट्रिक्ट मॅजेस्ट्रेट जी. कृष्णैया यांची हत्या करणारा बिहारचा गँगस्टर माजी खासदार आनंद मोहन सिंह याची नितीश कुमार – तेजस्वी यादव सरकारने सहरसा तुरुंगातून सुटका केली आहे. तो त्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. परंतु नियमावलीत बदल करून बिहार सरकारने आनंद मोहनची सुटका केली आहे.Bihar gangster former MP Anand Mohan released from jail; G. Krishnaiah’s wife, daughter and Andhra IAS Association strongly opposed the release

    आनंद मोहनच्या सुटकेला जी. कृष्णैया यांची पत्नी आणि मुलगी यांनी विरोध केला असून त्यांना आंध्र प्रदेश आयएएस असोसिएशन या अधिकाऱ्यांच्या संघटनेने साथ देत तीव्र विरोध केला आहे. आनंद मोहन याची नियमानुसार सुटका केल्याचा दावा नितीश कुमार – तेजस्वी यादव सरकारने केला आहे, तर आनंद मोहन यांच्यासारख्या खुन्याची जर नियम तोडून मरोडून सुटका केली, तर कोणताही आयएएस, आयपीएस अथवा आयएफएस अधिकारी सेवेसाठी पुढेच येणार नाही. त्यांचे मनोधैर्य खचेल, असे वक्तव्य जी कृष्णैया यांच्या पत्नी उमादेवी यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करून आनंद मोहन याला परत तुरुंगात धाडण्याची मागणी केली आहे. या मागणीला जी कृष्णैया यांची कन्या पद्मा यांनी देखील साथ दिली आहे. त्यांनी नितीश कुमार यांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे.





    आंध्र आयएएस असोसिएशनने देखील बिहार सरकारला एक विशेष पत्र लिहून आनंद मोहन याची सुटका करू नये. त्याची जन्मठेप कायम राहावी, यासाठी हायकोर्टात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.

    बिहारमध्ये आनंद मोहन यांच्या समर्थकांनी सहरसा जेल बाहेर त्याचे जोरदार स्वागत केले. पण आता आंध्रमध्ये मात्र बिहार सरकारच्या निर्णया विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला असून नितीश कुमार – तेजस्वी यादव आणि आनंद मोहन यांच्याविरुद्ध तीव्र जनमत तयार होऊ लागले आहे. आनंद मोहनची सुटका केल्यानंतर लोकांचा रोष रस्त्यावर येईल, असा इशारा जी. कृष्णैया यांच्या पत्नी उमादेवी यांनी दिला आहे.

    Bihar gangster former MP Anand Mohan released from jail; G. Krishnaiah’s wife, daughter and Andhra IAS Association strongly opposed the release

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य