विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांना स्टीव्हन्सजॉन्सन सिंड्रोम (एसजेएस) हा अत्यंत दुर्मिळ विकार झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे त्वचेवर पुरळ, फोड येऊन नंतर त्वचा सोलटून निघते.Bihar BJP president diagnosed with rare disorder
डॉ. जयस्वाल यांनीच फेसबुकवर ही माहिती दिली आहे. पुढील किमान एक आठवडा आपल्याला भेटण्यासाठी येऊ नये. प्रतिकारशक्ती कमी असल्याने संसर्ग होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सीएम सिंह म्हणाले की औषधाची रिअॅक्शन (प्रतिक्रिया) आल्याने हा विकार झाला आहे. जयस्वाल यांना 30 आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले. एम्समधील डॉक्टरांनी सांगितले की हा विकार म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा संधिवात आहे.
यामध्ये तीव्र वेदना होऊन त्वचेला लालसरपणा येतो. जयस्वाल यांना ताप येत होता, त्वचेवर पुरळ आले होते. डेंग्यू किंवा चिकनगुनिया आहे का हे देखील आपण तपासले. परंतु, त्यांना एजसेएस हा दुर्मिळ विकार झाल्याचे दिसून आले आहे.डॉ जयस्वाल म्हणाले की, 25 आॅगस्ट रोजी कोलकाता येथे असताना त्यांना ताप आला.
Bihar BJP president diagnosed with rare disorder
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशातील पूर्व- पश्चिम भाग गंगा द्रूतगती महामार्गाने जोडला जाणार, ३६ हजार कोटी टी रुपयांचा खर्च
- अॅप्स डाऊनलोड करताना जरा जपूनच, तब्बल ४८ हजार फेसबुक अकाऊंटस हॅक करून गैरवापर, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही फसवणूक
- जीडीपीनंतर जीएसटीचीही घौडदौड, सलग दुसऱ्यांदा जीएसटी महसूल एक लाख कोटींवर
- असेही महिला सक्षमीकरण, महिला सरपंचाकडे ११ कोटींची माया, एक एकराचा स्विमींग पूल असलेला बंगला