‘’२०२४ आणि २०२५ मध्ये ही वचनबद्धता पाळा.’’, असे आवाहनही लोकांना केले आहे.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारचे राजकारण नेहमीच रंजक राहिले आहे. गुन्हेगारी असो वा राजकीय वक्तृत्व, बिहार कायमच चर्चेत असते. बिहार भाजपा अध्यक्ष सम्राट चौधरी यांनी यावेळी ‘योगी स्टाईल’मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांना खुला इशारा दिला आहे. याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशातील उमेशपाल हत्याकांडात यूपी पोलिसांच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ‘’मिट्टी मे मिला देंगे’’ हे वक्तव्य चर्चेत आले आहे. अशाचप्रकारे बिहार भाजपा अध्यक्ष सम्राट चौधरी यांनीही मुख्यमंत्री नितीश कुमारांना इशारा दिला आहे. Bihar BJP chief Samrat Chaudhary warned Nitish Kumar in Yogi style
बिहार भाजपाने २२ एप्रिल रोजी पाटणा येथे भामाशाह जयंती साजरी केली. या कार्यक्रमात भाजपाचे अनेक नेते सहभागी झाले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी यावेळी म्हटले की, ”जेव्हा पंतप्रधानांनी आपली वचनबद्धता पूर्ण केली. २०२० मध्ये त्यांनी घोषणा केली होती की आमचे मुख्यमंत्री नितीश कुमार असतील, मात्र त्यानंतरही ते(नितीश कुमार) पळून गेले. ते पळून गेल्याने आता त्यांना राजकीयदृष्ट्या मातीत मिसळण्याचे काम करा, एवढेच मी म्हणेन. ज्याप्रमाणे यूपीमध्ये माफिया आणि गुन्हेगारांना नेस्तनाबूत करण्याचे काम केले जात आहे, त्याचप्रमाणे २०२४ आणि २०२५मध्ये राजकीयदृष्ट्या ही वचनबद्धता पाळा.’’
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पलटूराम म्हणत भाजपाने त्यांना कायमच घेरले आहे. याशिवाय नितीश कुमारांची नजर आता मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीकडे नाही तर दिल्लीकडे असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे, मात्र नितीश कुमारांनी हे नाकारलं आहे.
Bihar BJP chief Samrat Chaudhary warned Nitish Kumar in Yogi style
महत्वाच्या बातम्या
- सत्यपाल मलिकांना मिळालेल्या CBIच्या समन्सवर गृहमंत्री अमित शाहांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- … ही तर वरवरची मलमपट्टी: गांभीर्य असेल तर आरक्षण मर्यादेविषयी भूमिका स्पष्ट करा! अशोक चव्हाण
- … तेव्हा राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती का?; हिंदु जनजागृती समितीचा सवाल
- अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…