विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये राजकीय भूकंप पूर्वीचे हादरे बसू लागले आहेत. मुख्यमंत्री नीतीश कुमार सरकारला अखेरची घरघर लागल्याची बातमी समोर आली आहे. नितीश कुमार यांच्या सरकार मधले मंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांच्यासह विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांनी लालूप्रसादांचे घर गाठले आहे. तेथे नीतीश कुमार सरकार पाडायचे घाटत आहे. Bihar Assembly Speaker Awadh Bihari Chaudhary arrived at the residence of RJ(D) chief Lalu Prasad Yadav
लालूप्रसाद यादव यांना कोणत्याही परिस्थितीत तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवायचे असल्याने राज्यातल्या घडामोडी तेजीत आल्या आहेत. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष खासदार लल्लन सिंह यांना नितीश कुमार यांनी राजीनामा द्यायला लावून ते स्वतःच पक्षाध्यक्ष बनले.
लल्लन सिंह नितेश कुमार यांच्या 43 समर्थक आमदारांपैकी 20 आमदार फोडून लालूप्रसादांना जाऊन मिळाल्याचा संशय नितीश कुमार यांना आल्याने त्यांनी वेगळीच खेळी करून लल्लन सिंह यांचे संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष पद काढून घेतले आणि त्यांना पक्षात बेदखल करून ठेवले. परंतु, तरीदेखील प्रत्यक्षात संयुक्त जनता दलातील एकी मात्र नितीश कुमार टिकवू शकले नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे.
बिहार विधानसभेत नितीश कुमार यांचे फक्त 43 आमदार आहेत, तर लालूप्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे 78 आमदार आहेत. नितीश कुमार यांचे 20 आमदार फोडून लालूप्रसाद यादव हे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवू शकतात, अशी स्थिती आहे आणि त्यांचे तसेच प्रयत्न सुरू असून त्यांना विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांची साथ मिळाल्याचे मानले जात आहे. अवध बिहारी चौधरी हे राष्ट्रीय जनता दलाचे आमदार आहेत त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद सोपवून नितीश कुमार यांनी राजकीय चूक केल्याचे आता दिसून येण्याची शक्यता आहे.
कारण नितीश कुमार यांचे 20 आमदार फुटले की अवध बिहारी चौधरी हे ताबडतोब नव्या गटाला मान्यता देऊन तो नवा गट स्वतंत्र अस्तित्व टिकवून विधानसभेत बसवतील किंवा तो लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात सामील होऊन जाईल. त्यामुळे नीतीश कुमार यांच्या सरकारला अखेरची घरघर लागल्याचे मानले जात असून पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या नितीश कुमार यांच्या राजकीय कारकिर्दीची इतिश्री मुख्यमंत्रीपद जाण्यातून होण्याची चिन्हे दिसत आहेत!!
Bihar Assembly Speaker Awadh Bihari Chaudhary arrived at the residence of RJ(D) chief Lalu Prasad Yadav
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांना मोठा धक्का, उमेदवारी रद्द
- विनेश फोगटने खेलरत्न-अर्जुन पुरस्कार परत केले; बजरंग पुनिया म्हणाला- महिला कुस्तीपटूंसाठी सर्वात वाईट काळ
- महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंचा पलड़ा पवारांवर भारी; पवारांच्या “राष्ट्रीय” राजकारणाची ही तर खरी “बारामती श्री”!!
- रशियाच्या बॉम्बहल्ल्यांनी युक्रेन हादरले, 122 क्षेपणास्त्रे, 36 ड्रोनने हल्ला; 24 जणांचा मृत्यू