• Download App
    Chirag Paswan बिहार विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग;

    Chirag Paswan : बिहार विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग; चिराग पासवान यांनी दिले संकेत

    Chirag Paswan

    दिल्लीत चिराग पासवान यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना भूमिका स्पष्ट केली


    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : Chirag Paswan केंद्रीयमंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (राम विलास) प्रमुख चिराग पासवान या वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लढतील की नाही? चिराग पासवान कोणत्या जागेवरून निवडणूक लढवतील? चिराग पासवान यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवले जाईल का? असे सर्व प्रश्न सध्या केवळ सोशल मीडियावरच नाही तर राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहेत.Chirag Paswan

    मात्र आता या प्रश्नांना उत्तर देताना चिराग पासवान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, की त्यांच्या पक्षाकडून त्यांना जो काही आदेश मिळेल तो ते निश्चितपणे पाळतील. खरंतर लोक जनशक्ती पक्षाचे (राम विलास) प्रमुख चिराग पासवान यांनी सोमवारी दिल्लीत माध्यमांशी बोलताना या प्रश्नांची अगदीच स्पष्टपणे उत्तरं दिली नाहीत. परंतु त्यांनी त्यांचा हेतू मात्र नक्कीच स्पष्ट केला. आहे.



    निवडणुका लढवण्याबाबत माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, पक्षाचे यावर काहीही मत असो, मी त्याचे नक्कीच पालन करेन. सध्या यावर अधिक चर्चा होणे बाकी आहे. तर चिराग यांच्या या उत्तराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    कारण, या आधी चिराग पासवान यांनी स्पष्टपणे संकेत दिले होते की त्यांचा पक्ष बिहार विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवेल. त्यामुळे आता चिराग यांचा पक्ष एनडीएमध्ये राहून अधिकाधिक जागांची मागणी करेल अशीही चर्चा आहे.

    Bihar Assembly Election Movement Chirag Paswan gives indication

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार