वृत्तसंस्था
हैदराबाद : तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी 66.9 कोटी लोक आणि कंपन्यांचा डेटा चोरणाऱ्या व्यक्तीला शनिवारी अटक केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी डेटा चोरी असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 24 राज्ये आणि 8 मोठ्या शहरांमध्ये हा डेटा चोरीला गेला आहे.Biggest data theft ever, Bhamtya sells data of 66.9 crore people, including military and government officials
विनय भारद्वाज असे आरोपीचे नाव आहे. तो फरिदाबाद, हरियाणा येथून InspireWebz वेबसाइटद्वारे काम करत होता. तो चोरलेला डेटा क्लाउड ड्राईव्ह लिंकद्वारे ग्राहकांना विकत होता. पोलिसांनी 2 मोबाइल फोन आणि 2 लॅपटॉप जप्त केले आहेत.
कोणत्या लोकांचा आणि कंपन्यांचा डेटा चोरीला गेला?
पोलिसांनी सांगितले की, बायजू आणि वेदांतूचे विद्यार्थी, 1.84 लाख कॅब युझर्स, 4.5 लाख पगारदार कर्मचारी यांचा डेटा आरोपींकडे सापडला आहे.
जीएसटी आणि आरटीओ यांसारख्या मोठ्या संस्थांव्यतिरिक्त, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, यूट्यूब, पेटीएम, फोनपे, बिग बास्केट, बुक माय शो, इन्स्टाग्राम, झोमॅटो, पॉलिसी बाजार यासारख्या कंपन्यांचा डेटादेखील प्राप्त झाला आहे.
सरकारी अधिकारी आणि लष्करी अधिकारी, पॅनकार्डधारक, 9वी-10वी, 11वी-12वीचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिल्लीतील वीज ग्राहक, डी-मॅट खाते असलेले लोक, अनेक लोकांचे मोबाईल नंबरही आरोपींकडे सापडले आहेत.
एनईईटीचे विद्यार्थी, अतिश्रीमंत व्यक्ती, विमाधारक, डेबिट आणि क्रेडिट कार्डधारक यांचा डेटाही चोरीला गेला.
कोणत्या प्रकारचा डेटा चोरीला गेला?
NEET विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता असा डेटा चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. पॅन कार्डधारकांच्या चोरी झालेल्या डेटामध्ये उत्पन्न, ई-मेल आयडी, फोन नंबर यासारख्या माहितीचा समावेश आहे. सरकारी अधिकार्यांचे नाव, मोबाईल नंबर, श्रेणी, जन्मतारीख इत्यादी डेटा चोरीला गेला आहे.
Biggest data theft ever, Bhamtya sells data of 66.9 crore people, including military and government officials
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा