• Download App
    व्हिस्टाडोम कोचना मोठा प्रतिसाद; निसर्ग दर्शनाने प्रवासी सुखावले; मध्य रेल्वेला २.३८ कोटींचे उत्पन्न। Big response to Vistadom Koch ; The sight of nature comforted the traveler; Central Railway earns Rs 2.38 crore

    व्हिस्टाडोम कोचना मोठा प्रतिसाद; निसर्ग दर्शनाने प्रवासी सुखावले; मध्य रेल्वेला २.३८ कोटींचे उत्पन्न

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम कोचना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. निसर्ग दर्शनाने प्रवासी सुखावले असून रेल्वेला २.३८ कोटी रुपयांचे उत्पन्न आजअखेर मिळाले आहे. Big response to Vistadom Koch ; The sight of nature comforted the traveler; Central Railway earns Rs 2.38 crore

    प्रवाशांना प्रवासादरम्यान निसर्गरम्य स्थळांचा आनंद घेता यावा. दृश्य टिपता यावीत, यासाठी रेल्वेने खास पारदर्शक असे व्हिस्टाडोम डबे तयार करून ते रेल्वेला जोडले आहेत. त्या माध्यमातून नद्या, धबधबे, पश्चिम घाटाचे पारदर्शी दर्शन प्रवाशांना घेता आले. मुंबई ते गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या, धबधबे, पश्चिम घाट अशी दृश्ये प्रवासी आपल्या डोळ्यांत कैद करीत आहेत. याद्वारे मध्य रेल्वेने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या काळात २०,४०७ प्रवाशांची नोंद केली. त्या माध्यमातून २.३८ कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वेने प्राप्त केले.



    व्हिस्टाडोम डब्यांचे वैशिष्ट्य

    • काचेचे पारदर्शक छत
    • रुंद खिडक्या
    • एलईडी दिवे
    • फिरता येण्याजोगे आसन
    • पुशबॅक खुर्ची
    • जीपीएस आधारित माहिती प्रणाली
    • मल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीन
    • इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजे
    • दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे
    • सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट
    • व्ह्यूइंग गॅलरी 

    कोणत्या गाड्यांत डबे जोडले

    • मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये
    •  मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये
    •  मुंबई-पुणे डेक्कन क्विन

    किती उत्पन्न

    • मुंबई – मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसच्या
      ७,७५४ प्रवाशांकडून १.४० कोटी
    • डेक्कन एक्स्प्रेस ७,१८५ प्रवाशांकडून ५०.९६ लाख
    • डेक्कन क्विनने ५,४६८ प्रवाशांकडून ४६.३० लाख

    Big response to Vistadom Koch ; The sight of nature comforted the traveler; Central Railway earns Rs 2.38 crore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार