गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात आज (मंगळवार, १ ऑगस्ट)पासून कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता ९९.७५ रुपयांनी कमी झाली आहे. यासोबतच दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत १६८० रुपये झाली आहे. Big reduction in the price of LPG commercial cylinders
तेल कंपन्या दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला एलपीजीची किंमत बदलतात. जुलैमध्ये तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ७ रुपयांनी वाढ केली होती. या वाढीनंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १,७८० रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली होती. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत होते. यामध्ये सर्वाधिक परिणाम व्यावसायिक गॅस सिलिंडरवर दिसून आला. या वर्षी मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रति युनिट ३५०.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. तथापि, मे महिन्यात त्यांच्या किमती १७१.५० रुपयांनी कमी झाल्या.
Big reduction in the price of LPG commercial cylinders
महत्वाच्या बातम्या
- समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना! शहापूर येथे गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू
- Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘NDA’ खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दिला कानमंत्र!
- 2015 मधले भाकीत 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वांत मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर!!
- Land For Job Scam प्रकरणात ‘ED’चा लालूंना दणका, सहा कोटींची मालमत्ता जप्त!