देशात मोठा घातपात घडवून आणण्यासाठी हे लोक देशविरोधी कट रचत होते
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : दहशतवादी घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश एटीएसने मोठी कारवाई केली आहे. यूपी एटीएसने ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित चार जणांना ताब्यात घेतले आहे. Big operation of Uttar Pradesh ATS against terrorism arrested four people related to ISIS
अटक करण्यात आलेले आरोपी हिंसक दहशतवादी जिहाद पुकारून आणि देशातील निवडून आलेले सरकार पाडून शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती एटीएसने दिली आहे. हे लोक ISIS चे दहशतवादी साहित्य समान मानसिकतेच्या लोकांमध्ये वाटून त्यांना त्यांच्या दहशतवादी संघटना ISIS शी जोडण्याचे काम करत होते.
गुजरात एटीएसने पोरबंदरमधून ISISशी संबंधित 5 जणांना केली अटक, परदेशात पळून जाणार होते
काही दिवसांपूर्वीच अब्दुल्ला अर्सलान, माझ बिन तारिक आणि वाजिउद्दीन नावाच्या आरोपींना यूपी एटीएसने अटक केली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर एटीएसला इसिसशी संबंधित इतर अनेक लोकांची माहिती मिळाली. कारवाई करत एटीएसने रकीब इमाम, नावेद सिद्दीकी, मोहम्मद नोमान आणि मोहम्मद नाझीम नावाच्या लोकांना अटक केली आहे.
यूपी एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, या कामात आरोपी गुप्तपणे लोकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणि गुप्त ठिकाणी दहशतवादी जिहादसाठी मानसिक आणि शारीरिक प्रशिक्षण देऊन दहशतवादी जिहादसाठी तयार करत होते. देशात मोठा घातपात घडवून आणण्यासाठी हे लोक देशविरोधी कट रचत होते. हे सर्व आरोपी अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या सभांद्वारे एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्याच नावाखाली ते नवीन लोकांना आयएसआयएसशी जोडायचे आहे.
Big operation of Uttar Pradesh ATS against terrorism arrested four people related to ISIS
महत्वाच्या बातम्या
- WATCH : पंतप्रधानांच्या जाहीर सभेत खांबावर चढली होती मुलगी, पीएम मोदींनी घातली समजूत
- मडिगा आरक्षणासाठी जीवन व्यतीत केलेले मंदा कृष्ण मडिगा मोदींच्या खांद्यावर डोके ठेवून रडले तेव्हा…
- अयोध्येने स्वतःचाच विश्वविक्रम मोडला, राम की पैडीवर एकाच वेळी २२ लाख दिवे झाले प्रज्वलित!
- उत्तराखंडला समान नागरी कायद्याची दिवाळी भेट; पुढील आठवड्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन!!