uniform civil code : उत्तराखंड निवडणुकीपूर्वी खटिमा येथे पोहोचलेले राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी उत्तराखंडमध्ये लवकरात लवकर समान नागरी संहिता (यूसीसी) लागू केली जाईल, असे सांगितले आहे. सीएम धामी म्हणाले की, निवडणुकीनंतर नवीन सरकारची शपथ घेतल्यानंतर, विधिज्ञांची एक समिती स्थापन केली जाईल, जी राज्यातील समान नागरी संहितेचा मसुदा तयार करेल. Big News Uttarakhand Chief Minister Dhami says will form a committee for uniform civil code as soon as new government is formed
वृत्तसंस्था
देहरादून : उत्तराखंड निवडणुकीपूर्वी खटिमा येथे पोहोचलेले राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी उत्तराखंडमध्ये लवकरात लवकर समान नागरी संहिता (यूसीसी) लागू केली जाईल, असे सांगितले आहे. सीएम धामी म्हणाले की, निवडणुकीनंतर नवीन सरकारची शपथ घेतल्यानंतर, विधिज्ञांची एक समिती स्थापन केली जाईल, जी राज्यातील समान नागरी संहितेचा मसुदा तयार करेल.
सीएम धामी म्हणाले की, यामुळे सामाजिक एकोपा वाढेल, लैंगिक न्यायाला चालना मिळेल, महिला सक्षमीकरण मजबूत होईल आणि राज्याच्या अपवादात्मक सांस्कृतिक-आध्यात्मिक ओळख आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यात मदत होईल. मी जी घोषणा करणार आहे तो माझ्या पक्षाचा संकल्प आहे आणि भाजपचे नवे सरकार स्थापन होताच तो पूर्ण होईल. देवभूमीची संस्कृती आणि वारसा अबाधित ठेवणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे, त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
ते म्हणाले की, “शपथग्रहणानंतर लवकरच, नवीन भाजप सरकार राज्यात एकसमान नागरी संहिता तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करेल. हे UCC सर्व लोकांसाठी विवाह, घटस्फोट, जमीन-मालमत्ता आणि वारसा यासंबंधी समान कायदे प्रदान करेल, मग त्यांची श्रद्धा काहीही असो.”
उल्लेखनीय आहे की, मुख्यमंत्री होण्यापूर्वी धामी दोन वेळा खटिमा विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्या मतदारसंघात औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माजी सैनिकांसाठी कॅन्टीन, शंभर बिघा जागेवर निवासी एकलव्य विद्यालय, रोडवेज स्टँड, बायपास, सुशोभीकरण, हुतात्मा स्थळाचे बांधकाम, सीटी स्कॅन सुविधा उभारली आहे. शासकीय रुग्णालयाची त्यांनी पायाभरणी केली आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.
Big News Uttarakhand Chief Minister Dhami says will form a committee for uniform civil code as soon as new government is formed
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाविरोधी लसीच्या सक्तीला तीव्र विरोध; कॅनडात ट्रकचालकांचे चक्क जाम आंदोलन
- ब्रिटिश संशोधकांची कमाल, प्रतिसुर्याची निर्मिती; अखंड आणि हरित उर्जानिर्मितीचा प्रयोग सफल
- नाशिकहून सुरतला पोहोचा अवघ्या सव्वा तासांत; नितीन गडकरी यांच्याकडून महामार्गाबाबत माहिती
- हिजाब वादाची पाकिस्तानी लिंक : सिख फॉर जस्टिसच्या मदतीने आयएसआयकडून अराजकतेसाठी प्रयत्न, आयबीने जारी केला अलर्ट