• Download App
    plane crash मोठी बातमी! अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना; एअर इंडियाचे विमान कोसळले

    मोठी बातमी! अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना; एअर इंडियाचे विमान कोसळले

    विमानात १५० प्रवासी होते आणि विमान लंडनला निघाले होते.

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. अहमदाबादमध्ये टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याचे वृत्त आहे. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात जवळपास १५० प्रवासी होते असे सांगण्यात येत आहे.

    गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताची बातमी आहे. अपघातस्थळावरून आकाशात काळे धूराचे लोट जाताना दिसत आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ अपघात झाला. विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली.

    Big news Fatal plane crash in Ahmedabad Air India plane crashes

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे