वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत बीएड (बॅचलर ऑफ एज्युकेशन) पदवीधारक उमेदवार प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी अपात्र आहेत, असा निर्णय दिला आहे. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आलेल्या या निकालाचा बीएड आणि बीटीसीद्वारे अध्यापनाच्या क्षेत्रात जाणाऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.Big News ‘BEd’ degree holders ineligible for primary teacher post; An important judgment of the Supreme Court
काय आहे प्रकरण?
– 2018 मध्ये राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) जारी केलेल्या अधिसूचनेवरून वाद निर्माण झाला. या अधिसूचनेमध्ये बीएड पदवी असलेल्या उमेदवारांना राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (आरईईटी) अर्ज करण्यास पात्र मानले जाईल अशी तरतूद करण्यात आली होती. त्यापूर्वी, फक्त बीटीसी-पात्र उमेदवारच पीआरटी पदांसाठी अर्ज करू शकत होते. या अधिसूचनेला विरोध झाला.
तर ती सक्तीच निरर्थक ठरेल- सुप्रीम कोर्ट
प्राथमिक शिक्षण हा घटनेच्या कलम 21 अ अंतर्गत मूलभूत अधिकार आहे. मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणात आपण गुणवत्तेशी तडजोड केली, तर ती सक्तीच निरर्थक ठरते, असे निरीक्षण नोंदवत बी.एड (बॅचलर ऑफ एज्युकेशन) पदवीधारक हे प्राथमिक (इयत्ता पहिली ते पाचवी) शाळेतील शिक्षक पदासाठी अपात्र ठरतात, असा निकाल नुकताच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने दिला आहे.
राजस्थान हायकोर्टाचा निकाल कायम
बीएड उमेदवारांना प्राथमिक शाळेतील शिक्षक होण्याची परवानगी देणारी 2018 राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची एनसीटीई ची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाला एनसीटीई, काही बीएड उमेदवार, पात्र डिप्लोमा धारक आणि केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले की, एससीटीईच्या नियमांनुसार प्राथमिक शिक्षक पदांसाठी आवश्यक पात्रता ही प्राथमिक शिक्षणातील डिप्लोमा आहे. प्राथमिक शिक्षणाचा डिप्लोमा असलेल्या उमेदवाराला या स्तरावर विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. पहिले ते पाचवी पर्यंतच्या वर्गातील मुलांना कसे शिकवावे या उद्देशानेच हा अभ्यासक्रम आहे. बीएड पदवीधारक हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पात्र असतो. त्यांना प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे अपेक्षित नाही.
Big News ‘BEd’ degree holders ineligible for primary teacher post; An important judgment of the Supreme Court
महत्वाच्या बातम्या
- Independence Day : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार, कोट्यवधी नागरिकांचे लक्ष भाषणाकडे
- हिमाचलमध्ये पावसामुळे प्रचंड विध्वंस, आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला केले संबोधित
- योगींच्या यूपीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा पडल्या 1 कोटी रुपयांच्या महागात!!