ज्या गाडीतून ते प्रवास करत होता त्याची काच फुटली
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : बंगालमधील मालदा जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. आज भारत जोडो न्याय यात्रा बंगालमध्ये पोहोचली आहे. यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. Big news Attack on Rahul Gandhis convoy in Bengal
काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. ज्या गाडीतून ते प्रवास करत होता त्याची काच फुटली. बिहारमधून यात्रा पश्चिम बंगालमध्ये परत येत असताना मालदाच्या हरिश्चंद्रपूर भागात हा हल्ला झाला.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, बुधवारी पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा एक भाग म्हणून राहुल गांधी प्रवास करत असलेल्या कारवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. या घटनेत वाहनाच्या मागील खिडकीच्या काचा फुटल्या मात्र गांधी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
या घटनेची माहिती देताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, “मागून कोणीतरी दगडफेक केली असावी. पोलिस दुर्लक्ष करत आहेत. निष्काळजीपणामुळे ही घटना घडली, अशी कोणतीही मोठी घटना घडू शकते.”
Big news Attack on Rahul Gandhis convoy in Bengal
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल म्हणाले- भाजप ट्रम्पप्रमाणे सत्तेला चिकटून राहणार; लोकसभेत हरल्यानंतरही जागा सोडणार नाही
- मद्रास हायकोर्टाचा आदेश- मंदिर हे पिकनिक स्पॉट नाही; बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी, मंदिराच्या गेटवर नो एन्ट्री बोर्ड लावण्याचे निर्देश
- INDI आघाडी बंगालमध्ये ममतांनी तोडली; केरळात डाव्यांनी फोडली; उत्तर प्रदेशात अखिलेशने मोडली!!
- जियोची केंद्र सरकारला शिफारस, युझर्स 5जीवर शिफ्ट करण्यासाठी धोरणाची गरज, 2जी-3जी बंद करा