आसाम आणि मेघालय राज्य सरकारांनी 50 वर्षे जुना सीमावाद सोडवण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि कॉनराड कोंगकल संगमा यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीत एका करारावर स्वाक्षरी केली. यानंतर 12 सर्वाधिक वादग्रस्त क्षेत्रांपैकी 6 क्षेत्रांची राज्य सीमा निश्चित करण्यात आली आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित होते.Big news Assam-Meghalaya 50-year-old border dispute resolved, Himanta Biswa Sarma and Conrad Sangma sign border agreement in Delhi
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आसाम आणि मेघालय राज्य सरकारांनी 50 वर्षे जुना सीमावाद सोडवण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि कॉनराड कोंगकल संगमा यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीत एका करारावर स्वाक्षरी केली. यानंतर 12 सर्वाधिक वादग्रस्त क्षेत्रांपैकी 6 क्षेत्रांची राज्य सीमा निश्चित करण्यात आली आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना गृहमंत्री अमित शहादेखील उपस्थित होते.
उर्वरित भागांबाबतही 6 महिन्यांत निर्णयाची शक्यता
सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, हा आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. या सामंजस्य करारानंतर, येत्या 6-7 महिन्यांत उर्वरित विवादित स्थळांची समस्या सोडविण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्ही ईशान्य क्षेत्राला देशासाठी विकासाचे इंजिन बनवण्याच्या दिशेने काम करू.
31 जानेवारीला पाठवला होता प्रस्ताव
आसाम आणि मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी गृह मंत्रालयाकडे तपासणी आणि विचारासाठी मसुदा पाठवला होता. आसाम आणि मेघालय सरकारने 884 किमीच्या 12 पैकी 6 सीमावर्ती भागात सीमा विवाद सोडवण्यास सहमती दर्शवली आहे. 36.79 चौरस किमी जमिनीसाठी पाठवलेल्या शिफारशींनुसार, आसाम 18.51 चौरस किमी स्वत:कडे ठेवेल आणि उर्वरित 18.28 चौरस किमी मेघालयला देईल.
दोन्ही राज्यांमधील हा करार खूप महत्त्वाचा आहे, कारण हा वाद खूप दिवसांपासून सुरू आहे. 1972 मध्ये जेव्हा मेघालय आसाममधून वेगळे झाले तेव्हा त्याची सुरुवात झाली. नवीन राज्य निर्मितीच्या कराराच्या सीमांकनादरम्यान अनेक क्षेत्रांचे वाद चव्हाट्यावर आले होते.
सीमावादामुळे हिंसक घटना
14 मे 2010 रोजी, आसाममधील कामरूपच्या सीमेवर असलेल्या पश्चिम खासी हिल्समधील लांगपीह येथे आसाम पोलिस कर्मचार्यांनी केलेल्या गोळीबारात खासी समाजातील चार गावकरी ठार झाले. तर 12 जण जखमी झाले होते.
26 जुलै 2021 रोजी आतापर्यंतचा सर्वात भीषण हिंसाचार झाला. ज्यामध्ये आसाम पोलिसांचे सहा जवान शहीद झाले आणि दोन्ही राज्यांतील सुमारे 100 लोक आणि सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.
6 भागांवर दोन्ही राज्यांनी सहमती दर्शविली
आसाम-मेघालय सीमा विवादाशी संबंधित सहा क्षेत्रे म्हणजे ताराबारी, गिजांग, हाहिम, बोकलापारा, खानापारा-पिलांगकाटा आणि रातचेरा. जे मेघालयातील पश्चिम खासी हिल्स, री-भोई आणि पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यांचा भाग बनतात आणि आसामच्या बाजूने काचर, कामरूप (मेट्रो) आणि कामरूप जिल्ह्यांचा समावेश होतो. आंतरराज्य सीमेला लागून असलेल्या 36 विवादित गावांपैकी 30, एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 18.29 चौरस किमी, मेघालयात राहतील, तर 18.51 चौरस किमी आसाममध्ये आहे.
Big news Assam-Meghalaya 50-year-old border dispute resolved, Himanta Biswa Sarma and Conrad Sangma sign border agreement in Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- कार्यपध्दतीच संशयास्पद असल्याने जागतिक विषमता अहवाल सदोष, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले स्पष्ट
- पत्रकार राणा अयूबला लंडनला जाताना मुंबई विमानतळावरच रोखले, कोरोनाच्या नावाखाली
- ओएनजीसी लिमिटेड मधील 1.5% शेअर्स विकून सरकार उभारणार 3 हजार कोटी रुपये
- काश्मीर फाइल्सवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी सहारणपूरमधील मौलानांची पत्रकार परिषद, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की