• Download App
    मोठी बातमी : आधारसारखाच विद्यार्थ्यांसाठी येणार अपार आयडी, शैक्षणिक माहिती होणार जतन|Big news Apar ID for students similar to Aadhaar, educational information will be saved

    मोठी बातमी : आधारसारखाच विद्यार्थ्यांसाठी येणार अपार आयडी, शैक्षणिक माहिती होणार जतन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच अपार आयडी (APAAR ID) देशभरातील विद्यार्थ्यांची युनिक ओळख होणार आहे. तो आधारप्रमाणे १२ अंकी युनिक क्रमांक असेल. हा आयडी कोणत्याही विद्यार्थ्याला नर्सरी, शाळा वा महाविद्यालयात प्रवेश घेताच मिळेल. त्यात शाळा, महाविद्यालय, युनिव्हर्सिटी ट्रान्सफर, प्रमाणपत्र पडताळणी, स्किल ट्रेनिंग, इंटर्नशिप, स्कॉलरशिप, अवॉर्ड, कोर्स क्रेडिट ट्रान्सफर आणि इतर कोणत्याही कामगिरीची माहिती डिजिटल रूपात एकत्र केली जाईल.Big news Apar ID for students similar to Aadhaar, educational information will be saved

    देशभरात जवळपास ३० कोटी विद्यार्थी आहेत. त्यात ४.१ कोटी उच्च शिक्षण आणि जवळपास ४ कोटी स्किलिंग कोर्सशी निगडित आहेत. इतर शाळेत आहेत. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट सिस्टिम लागू झाल्यानंतर या सत्रात एक हजाराहून अधिक उच्च शिक्षण संस्थांतील एक कोटींहून जास्त विद्यार्थ्यांनी अपारसाठी नोंदणी केली आहे. सर्व ३० कोटी विद्यार्थ्यांना अपार क्रमांक देऊन या परिघात आणण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.



    शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांच्या सचिवांना पत्र लिहून शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अपारसाठी नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शाळा, उच्च शिक्षण व स्किलिंग या तीनही कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची माहिती एकाच छताखाली असावी, असे सूचित केले आहे.

    सर्वांची पडताळणी करण्याचे तंत्रज्ञान आवश्यक होते

    देशातील सर्व संस्थांकडे आपले विद्यार्थी, शिक्षकांची माहिती असते. मात्र ती एकाच फॉर्मेटमध्ये नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क आल्यानंतर मल्टिपल एग्झिट, एंट्री, नवे कोर्समध्ये लॅटरल एंट्री आदी काही तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. एकाच सिस्टिमध्ये सर्वांची पडताळणी होऊ शकेल, असे तंत्रज्ञान हवे होते. अनेकदा वेगवेगळ्या संस्थांकडे एकाच संस्थेबाबत उपलब्ध माहिती वेगवेगळी असू शकते. आता एकाच प्लॅटफॉर्मद्वारे माहितीच्या अदानप्रदानाने सर्व समस्या संपुष्टात येतील.

    केव्हा तयार होणार हा आयडी?

    अपार आयडी आधार क्रमांकाच्या माध्यमातून प्रसिद्ध होईल. तो केवळ शाळा-महाविद्यालयाच्या माध्यमातूनच बनेल. आई-वडील/पालकांची संमतीही घेतली जाईल. कारण ही माहिती शैक्षणिक विभाग आणि संस्थांकडून अादानप्रदान होईल. त्यानुसार मुलांच्या आधार कार्डची पडताळणी केली जाईल. अपारशी निगडित रेकॉर्ड डिजिलॉकरमध्ये उपलब्ध असेल.

    उपयोग कसा होईल?

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाशी निगडित प्रत्येक माहिती अपार क्रमांकासह उपलब्ध होईल. नोकरी मिळवण्यासाठीही थेट अपार क्रमांकाचा उपयोग करता येईल. नोकरी मिळवल्यानंतर स्किलिंग, रिस्किलिंग वा अपस्किलिंगमध्येही उपयोगी.रेल्वे आणि बस आरक्षण करताना अपार क्रमांकाचा उपयोग करता येऊ शकतो.

    Big news Apar ID for students similar to Aadhaar, educational information will be saved

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??