• Download App
    तब्बल १७० किलोमीटर लांबीचा प्रचंड हिमनग अंटार्क्टिका खंडापासून विलग, तापमानवाढीचा परिणाम।Big iceberg detached from antratica

    तब्बल १७० किलोमीटर लांबीचा प्रचंड हिमनग अंटार्क्टिका खंडापासून विलग, तापमानवाढीचा परिणाम

    वृत्तसंस्था

    पॅरीस : जगातील सर्वांत मोठा हिमनग अंटार्क्टिका खंडापासून विलग झाला आहे. अंटार्क्टिका खंडाच्या रॉनी आइस शेल्फ या भागापासून तुटून बाजूला झालेला हा हिमनग सध्या वेडल समुद्रात तरंगत आहे.
    या हिमनगाची लांबी १७० किलोमीटर असून रुंदी २५ किलोमीटर इतकी आहे. Big iceberg detached from antratica

    स्पेनच्या माजोर्का या बेटापेक्षाही हा हिमनग मोठा आहे. या हिमनगाचा आकार पाहता तो ‘ए-२३ ए’ या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या हिमनगापेक्षाही मोठा असल्याचे सिद्ध होत आहे. या हिमनगाचा आकार ३,८८० चौरस किमी इतका असल्याचे युरोपीय अवकाश संस्थेने सांगितले आहे. हा हिमनगही वेडल समुद्रातच आहे.



    ‘ए-७६’ असे नाव या हिमनगाला देण्यात आले असून त्याचा आकार ४,३२० चौरस किलोमीटर इतका प्रचंड आहे. ‘कोपर्निकस सेंटिनेल-१’ या उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रावरून हिमनगग तुटल्याची बाब उघडकीस आली.

    फेब्रुवारी महिन्यात अंटार्क्टिका खंडाच्या ब्रंट आइस शेल्फ भागापासून ‘ए-७४’ हा हिमनग तुटून बाजूला झाला होता. त्याचा आकार १,२७० चौरस किमी इतका होता. पर्यावरण बदलामुळे तापमानात वाढ होत असून त्यामुळेच हिमनग तुटून बाजूला होत असल्याचा अंदाज पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

    Big iceberg detached from antratica

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये